Top news मनोरंजन

पूजा भट्टनं सांगितलं ड्र.ग्ज घेण्यामागचं कारण, सोशल मीडियावर झाली प्रचंड ट्रोल

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गज लोकांची नावे आत्तापर्यंत समोर आली आहेत. निर्माती अभिनेत्री पूजा भट्ट आपल्या बिनधास्त वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असते. अशातच आता अं.मली पदार्थ प्रकरणी पूजा भट्ट हिने काही सवाल विचारत याप्रकरणी ट्विटरवरून आपलं मत व्यक्त केलं आहे.

जे लोक दुःख कमी करण्यासाठी अं.मली पदार्थांच सेवन करतात, अशा लोकांची कोणाला काळजी आहे का? या लोकांची दुर्दशा व समस्या तुम्हाला माहित आहेत का?, असा सवाल करत पूजा भट्टनं आपल्या ट्वीटमधून आर्थिक व मानसिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांवर प्रश्न उपस्थित केला आहे.

तसेच जे लोक ड्र.ग्ज घेतात जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील दुःख कमी होईल. अशा शेवटच्या उपेक्षित लोकांबद्दल कोणाला काळजी आहे का?, असाही सवाल पूजानं आपल्या ट्वीटमधून केला आहे.

काही लोक आपली स्वप्न प्राप्त करण्यासाठी खूप तुटलेली असतात. आपल्या नशिबी आलेली गरिबी आणि दुःख यांसारख्या कारणामुळं ही लोक अं.मली पदार्थांसारख्या गोष्टींचा वापर करत असतात. या सर्व लोकांचं आयुष्य सुधारण्यात कोणाला रस आहे?, असंही पूजानं ट्वीटमधून म्हटलं आहे.

पूजा भट्टचं हे ट्वीट सध्या प्रचंड वेगानं व्हायरल होत आहे. पूजानं केलेल्या या वक्तव्यामुळ तिला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जात आहे. पूजा भट्टला या ट्वीटमुळं लोकांच्या अनेक प्रश्नांना सामोरं जाव लागत आहे.

दरम्यान, पूजा भट्टनं नुकतंच निर्माता हंसल मेहता यांच्या एका ट्वीटवर उत्तर देताना कलाकारांची बदनामी करणाऱ्या लोकांना धारेवर धरलं होतं. कोणताही अभिनेता छोटा किंवा मोठा नसतो, हंसल मेहता यांच्या या विधानाशी मी सहमत आहे. लोक अभिनेत्यांना खालीपणा दाखवण्यासाठी वर्कआउट अभिनेता, सी ग्रेड किंवा बी ग्रेड अभिनेता असे शब्द वापरत असतात, असं पूजानं ट्वीटमधून म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत आणि साराच्या नात्यावर कंगनानं केला धक्कादायक खुलासा! करीना कपूरचं नाव घेत म्हणाली…

सिद्धार्थ पिठानीनं दिली धक्कादायक माहिती, दिशा सॅलियनच्या मृ.त्यूची बातमी ऐकून सुशांत…

‘उर्मिला मातोंडकर एक सॉफ्ट पॉ.र्नस्टार आहे’; कंगना पुन्हा बरळली

पवना डॅमवर झिंगाट पार्ट्या, सुशांत ‘या’ अभिनेत्र्यांना घेऊन यायचा; बोटचालकांची माहिती

ड्र.ग्ज पार्टी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार; ‘या’ सात बड्या कलाकारांची नावं गोत्यात!