“शिवसेनेची केलेली चेष्टा किती महागात पडतीये हा अनुभव आपण घेताय”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे.

संजय राऊतांनी माझी केलेली चेष्टा महागात पडणार आहे, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी दिला होता. त्यावरून संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय.

नव्या धमकीबद्दल धन्यवाद, महाग पडेल म्हणजे?, असा प्रश्न करत संजय राऊत यांनी ईडी पकडून आणखी एक खोटे कांड करणार. बदनामीची मोहीम राबवणार. मुलाबाळांना त्रास देणार बरोबर?, असा सवाल संजय राऊतांनी ट्विटरद्वारे केला आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबाबत तुम्ही जी भाषा वापरता, चेष्टा करता ते सहन करायचे?, शिवसेनेशी केलेली चेष्टा किती महागात पडतीये हा अनुभव आपण घेताय, असा जोरदार टोला संजय राऊतांनी भाजपला लगावला आहे.

संजय राऊत यांनी सामनाच्या मुखपत्रातून चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली होती. चंद्रकांत पाटील यांच्या दाव्याने नरेंद्र मोदींची दोन तासांची झोप उडाली असेल, असा टोला राऊतांनी लगावला होता.

ही चमचेगिरीची हद्द आहे. आता हे चमचे काय बोलतात हे पहायला हवं, असंही संजय राऊत म्हणाले होते. संजय राऊतांच्या या टीकेवरून चंद्रकांंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.

तसेच संजय राऊत यांना माझी चेष्टा करणं महागात पडेल. मी जे बोलत आहे ते खरं ठरत आहे. मी म्हणलं काही जात्यात आहेत तर काही सुपात आहेत. जात्यातल्यांच पीठ व्हायला हवे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

दरम्यान, चंद्रकांत पाटलांनी चेष्टा महागात पडेल या इशाऱ्यावरून संजय राऊतांनी प्रश्नांची सरबत्ती करत ट्विट केलं आहे.  शिवसेनेशी केलेली चेष्टा किती महागात पडतीये हा अनुभव आपण घेताय, असा टोला त्यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

  पुढील 3 दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा 

  “संजय राऊतांनी केलेली माझी चेष्टा अंगावर येणार आहे, आता खूप काहीतरी…”

  “राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूूमिकेत तर शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत” 

  “काही नेते जात्यात, काही नेते सुपात, तर काहींचं पीठ झालंय” 

“तिजोरीच्या चाव्या माझ्याकडेत, नाहीतर ते काय देणार घंटा”