गुलाबराव पाटलांनी राज ठाकरेंना सुनावलं, म्हणाले “शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही…”

जळगाव | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदूत्वाची आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता थेट सरकारला अल्टीमेटम दिला आहे. येत्या 3 तारखेपर्यंत राज्यातील मशिदीवरील भोंगे काढून टाकावेत, अशी थेट भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे.

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीने मनसेवर निशाणा साधल्याचं पहायला मिळालं होतं.

त्यानंतर आता पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार आहे. त्याचबरोबर सामूहिक हनुमान चालिसा पठण देखील केलं जाणार आहे. त्यामुळे सध्या पुण्यात हिंदूजननायक असे पोस्टर लागले आहेत.

राज ठाकरेंच्या या कार्यक्रमावरून आता सार्वजनिक पाणीपुरवठा मंत्री आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे. हिंदूजननायक कोणाला म्हटलं तर तो काय हिंदू जननायक होतो का?, असा सवाल पाटलांनी विचारला आहे.

राज ठाकरेंचा जन्म शिवसेनेत झाला. शिवसेना राहिली नसती तर राज ठाकरे राहिले असते का, असंही गुलाबराव पाटलांनी विचारलं आहे. बाळासाहेब पाटलांच्या आशीर्वादाने ते युवासेनेचे अध्यक्ष होते, असंही पाटील म्हणालेत.

दरम्यान, शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही मोठे झालात त्या शिवसेनेवर बोलायचा तुम्हाला अधिकार नाही, असंही म्हणत गुलाबराव पाटलांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“एकेकाळी माझे पाय धरायचे, ते आता माझ्याविरोधात आणि पवारांवर बोलतात”

‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून अलर्ट जारी 

संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ 

“मोदींच्या नावावर मतं मागून शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले” 

आलिया-रणबीरच्या फोटोंवर Ex Girlfriend कतरिनाची कमेंट, म्हणाली…