“तुमच्याकडं चाणक्य तर आमच्याकडं लाल मातीतला बाप आहे”

मुंबई | 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार संपले असं वक्तव्य केलं होतं. यावरून राज्यात बराच गोंधळ झाला होता. आताही राज्यात फडणवीस यांच्या त्या वाक्याची चर्चा होत आहे.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या जोरदार वाद चालू आहे. फडणवीस यांनी अनेकदा शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

मलिक यांनी आता बोलताना फडणवीस यांच्या शरद पवार यांचं युग संपलं आहे या वाक्याची आठवण करून दिली आहे. काहीजण म्हणतात आमच्याकडं चाणक्य आहेत पण तुमच्याकडं चाणक्या असुद्या आमच्याकडं लालमातीतला बाप आहे, अशी घणाघाती टीका मलिक यांनी फडणवीस यांच्यावर केली आहे.

फडणवीस एकदा भरसभेत शरद पवार यांच्यावर टीका करताना पवार संपले असं म्हणाले होते. त्यानंतर पवार यांनी राज्यात सर्वत्र फिरून भाजपच्या हातातील सत्ता हिसकाऊन घेतली होती, याचीही आठवण मलिक यांनी करून दिली आहे.

सध्या राज्यात एनसीबीच्या कारवाईवरून बराच गोंधळ चालू आहे. एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या कार्यशैलीवर महाविकास आघाडीनं प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण प्रचंड तापलं होतं.

देवेंद्र फडणवीस यांचे आणि ड्रग्ज माफियांचे संबंध असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. यावरून मलिक यांच्यावर भाजपकडून जोरदार टीका होत आहे.

मलिक यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीस आणि ड्रग्ज प्रकरणात दोषी असलेला जयदिप राणा यांचे फोटो दाखवले होते. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मलिक यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते काॅंग्रेसच्या 10 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी पक्षप्रवेश कार्यक्रमात मलिक यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केल्याचं पहायला मिळालं आहे.

फडणवीस आणि मलिक या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर पत्रकार परिषद घेत टीका केली होती. आता फडणवीस आणि मलिक हे ट्विटच्या माध्यमातून एकमेकांवर सुविचार आणि शायरीच्या वापर करत टीका करत आहेत.

दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून सध्या राज्यासह देशात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. परिणामी केंद्रीय तपास यंत्रणांची विश्वासार्हता कमी होण्याची धोका निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

  मोठी बातमी! गुजरातमधून 350 कोटींचं ड्रग्ज जप्त

  ‘काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही…’; प्रियांका गांधींची मोठी घोषणा

“भाजपनं मशीन तयार केलीये, त्यात सगळे स्वच्छ होतात” 

“अडवाणी जिथे जिथे गेले तिथे त्यांनी द्वेषाची बीजे पेरली” 

मुख्यमंत्र्यांकडून नवाब मलिकांचं कौतुक, म्हणाले…’गुड गोईंग’