‘शिव्या खायला तयार राहावं लागणार’, ‘या’ अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

मराठी पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेला पहायला मिळतो. यातच शशांकनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओची चर्चा सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

या पोस्टमध्ये त्याने ‘आता शिव्या खायला तयार रहावं लागणार’ असे म्हटले आहे. शशांकला कोणाच्या शिव्या खायला लागणार आणि का? असे अनेक प्रश्न शशांकच्या चाहत्यांना पडले आहेत. मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तर शशांकच्या शेअर केलेल्या व्हिडीओमधून चाहत्यांना मिळणार आहे.

झी टीव्हीवर एका नवीन मालिकेसह शशांक केतकर आपल्या भेटीस येणार आहे. येत्या 1 मार्चपासून त्याची ‘पाहिले न मी तुला’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. मात्र या मालिकेत शशांक नेहमीपेक्षा एका वेगळ्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.

‘पाहिले न मी तुला’ या मालिकेतून शशांक एक निगेटिव्ह रोल साकारणारताना दिसणार आहे. या पहिले आपण त्याला नायकाच्याच भूमिकेत पाहिलं आहे. या भूमिकेत शशांक एका वेगळ्या आणि हटके भूमिकेत दिसणार आहे.

त्यामुळे नवीन मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षक कसे स्वीकारणार याबाबत शशांक जरा साशंक आहे. म्हणून त्याने मालिकेचा प्रोमो शेअर करत ‘शिव्या खायला तयार रहावं लागणार’ असे म्हटले आहे.

शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘पाहिले न मी तुला’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करत त्याने ‘माझ्या मते मला शिव्या खायला तयार राहावं लागणार आहे मला. एक अभिनेता म्हणून टेलिव्हिजनवर फार कमी वेळा असे प्रयोग करायला मिळतात’ असे त्याने म्हटले आहे. पुढे त्याने अशी खतरनाक संधी दिल्याबद्दल झी, कोठारे व्हिजन, आदित्य कोठारे, उर्मिला कोठारे यांचे आभार मानले आहेत.

शशांकने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले असले तरी ‘ होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळेच त्याला खरी ओळख मिळाली.  एक अभिनेता म्हणून शशांक नेहमीच प्रेक्षकांना भावलाय आता या निगेटीव्ह व्यक्तिरेखेतून शशांक प्रेक्षकांना कसा वाटतो, हे बघणं महत्त्वाचं ठरेल.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या कढीपत्ता खाण्याचे ‘हे’ फायदे

…तर पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील; मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

‘बिग बाॅस’ फेम ‘ही’ अभिनेत्री करणार लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण?, सोशल मीडियावर रंगली चर्चा

मुख्यमंत्री बलात्काऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत, संजय राठोडला तर चपलेने झोडायला पाहिजे- चित्रा वाघ

‘या’ अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज पाहूण चाहते घायाळ, पाहा फोटो

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy