“मोदीजी तुमचं आणि ट्रम्पचं काय बोलणं झालं हे तुम्ही देशाला सांगावं”

नवी दिल्ली : आमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.  

मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय संवाद झाला हे देशाला सांगावं, असं म्हणत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर काश्मीर प्रश्नावरून टीकास्त्र सोडंल आहे.

सोमवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. त्यावेळी मोदींनी काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी मला मदत मागितली. म्हणून मी मध्यस्थीस तयार झालो, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्रम्प यांच्याशी काश्मीर प्रश्नाबाबत कोणतंही बोलणं झालं नाही. मोदींनी फक्त द्वीपक्षीय संबंधांवर चर्चा केली असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी कशमीरबाबत केलेल्या वक्तव्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज गदारोळ झाला. 

महत्वाच्या बातम्या-

-मला तुमच्याकडून या प्रश्नाची अपेक्षा नव्हती- नुसरत जहाँ

-…म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे 25 टक्के उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात!

-“ट्रम्प खोटं बोलले; काश्मीर प्रश्नी मोदींनी मदत मागितलीच नाही”

-आधी कमलनाथांनी आणि आता रेड्डींनी फॉलो केला ‘राज ठाकरे पॅटर्न’!; स्थानिकांना 75 टक्के नोकऱ्या

-‘ती’ म्हणते; आदित्य ठाकरे येतील आणि आमचा प्रश्न लगोलग सुटेल… असं आम्हाला वाटलं नव्हतं!