पंजाबमध्ये मिळालेल्या यशानंतर अरविंद केजरीवालांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली | आम आदमी पार्टी (AAP) ने पंजाब विधानसभा निवडणुकीत 2022 मध्ये मोठा विजय नोंदवून इतर सर्व पक्षांना आश्चर्यचकित केलं आहे.

‘आप’ने राज्यातील 117 पैकी 92 जागा जिंकल्या आहेत. यानंतर रविवारी अमृतसरमध्ये आपच्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी ‘आप’च्या वतीने मोठा रोड शो आयोजित करण्यात आला होता.

पंजाबच्या विजयानंतर आता ‘आप’ने अन्य राज्यांकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत आम आदमी पक्ष आता पश्चिम बंगालमधील आगामी पंचायत निवडणुकाही लढवणार आहे.

पुढील वर्षी या निवडणुका होणार आहेत. या निर्णयामुळे तृणमूल काँग्रेस (TMC) आणि ममता बॅनर्जी यांच्यात थेट स्पर्धा होणार असल्याचं बोललं जात आहेत.

आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय पातळीवर पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. याअंतर्गत या दोघांनी गोवा विधानसभा निवडणूकही लढवली होती.

आम आदमी पक्ष दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी तेलंगणाकडे मुख्य मार्ग म्हणून पाहत आहे. आप नेते सोमनाथ भारती यांनी केसीआर राव यांची तुलना पंतप्रधान मोदींशी केली आहे.

पश्चिम बंगालसाठी आपल्या योजनेचा एक भाग म्हणून, AAP ने पक्षाला राज्यातील लोकांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला.

महत्वाच्या बातम्या- 

“…तर नोटीसप्रमाणे महाविकास आघाडीलाही जाळल्याशिवाय राहणार नाही” 

पोस्टाची भन्नाट योजना; तुमचे पैसे होतील दुप्पट

मोठी बातमी! झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्यासमोर ठेवला ‘तो’ प्रस्ताव

“उद्धव ठाकरेंना लाज वाटली पाहिजे, बाळासाहेबांचं नाव लावताना” 

“राष्ट्रवादीचे सर्वच नेते भ्रष्टाचाराने माखलेले, सगळे जेलमध्ये जाणार”