मुंबई | अभिनेत्री नोरा फतेही गेल्या काही एपिसोड्सपासून ‘इंडियाज बेस्ट डान्सर्स’ हा शो जज करत आहे. नोरापूर्वी अभिनेत्री मलाइका अरोरा हा शो जज करत होती. मात्र, काही दिवसांपूर्वी मलाइकाला कोरोनाची लागण झाली होती. यामुळे मलाइकावर उपचार चालू असल्यानं तिच्या जागेवर नोरा हा शो जज करत होती.
मलाइका आता शोमध्ये पुन्हा येत असल्यानं नोराला हा शो सोडावा लागत आहे. मात्र, नोरानं इंडियाज बेस्ट डान्सर्सच्या सेटवर तिच्या डान्सनं आग लावली होती. या काळात नोरानं अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत. अशातच आता इंडियाज बेस्ट डान्सर्सच्या सेटवरील नोराचा एक डान्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
नोराचा हा व्हिडिओ फिल्मी डान्सर्स या अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये नोरा तिचा चित्रपट ‘मरजावां’तील ‘प्यार दो प्यार लो’ या गाण्यावर डान्स करत आहे. नोरा प्यार दो या गाण्यावर महाराष्ट्राचं लोकप्रिय नृत्य लावणी करताना दिसत आहे.
इंडीआज बेस्ट डान्सर्सच्या सेटवर ऋतुजा जुन्नरकरनं लावणीचा ठेका धरत नृत्य सादर केलं होतं. ऋतुजाचा डान्स पाहून नोरानं लावणी शिकण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर ऋतुजा आणि नोरा दोघींनी मिळून स्टेजवर लावणीचा ठेका धरला.
नोरानं प्रथमच लावणी सादर केली होती. मात्र, नोराचा डान्स पाहून उपस्थित सर्वचजण आश्चर्यचकित झाले होते. नोरानं इंडीआज बेस्ट डान्सर्सच्या सेटवर अनेकवेळा डान्स सादर करत उपस्थितांची मनं जिंकली आहेत.
नोराची प्रत्येकच डान्स स्टेप खूपच जबरदस्त आहे. नोराच शोमधील जज आणि स्पर्धक सर्वांशीच उत्तम बॉंड पाहायला मिळालं आह. मोजक्याच एपिसोड्समध्ये नोरानं शोमध्ये चांगलीच धमाल केली आहे.
इंडीआज बेस्ट डान्सर्सच्या सेटवर सध्या खूप धमाल मस्ती पाहायला मिळत आहेत. या शोचं सूत्रसंचालन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष करत असल्यामुळे या रिअॅलीटी शोमध्ये कॉमेडीचा एक वेगळा तडका देखील पाहायला मिळत आहे.
दरम्यान, नोरानं इंडीआज बेस्ट डान्सर्सच्या सेटवर तिच्या आगामी चित्रपटाविषयी माहिती दिली आहे. नोरा येत्या काळात अजय देवगण आणि संजय दत्तसोबत ‘भुज द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटात दिसणार आहे. यापूर्वी नोरा फतेही ‘स्ट्रीट डान्सर 3’मध्ये दिसली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
स्पर्धेच्या मध्यातच दिल्लीच्या संघानं बदलली जर्सी; नवी जर्सी पहाल तर फिदा व्हाल!
अभिनेता अजय देवगनला मोठा धक्का; घरातील ‘या’ खास व्यक्तीला कायमचं गमावलं!