“मुख्यमंत्रिपद हडपण्यासाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली”

मुंबई | महाराष्ट्र राज्यामध्ये विरोधीपक्ष आणि सत्ताधारी पक्षांमध्ये सतत कोणत्याना-कोणत्या कारणावरून आरोप प्रत्यारोपांची खेळी ही सुरूच असते.

अशातच भाजप पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्रिपद हडपण्यासाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली, असं म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधला आहे.

आता ना तुमच्याकडे हिंदुत्व, ना धर्म आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेलं मुख्यमंत्रिपद. राणेंनी आपल्या ‘प्रहार’ वृत्तपत्रामधून उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.

तसेच त्यांनी मराठी माणसाची एकजूट करा. हिंदुस्थान धर्म वाढवाव, असंही राणे म्हणाले आहेत. त्याचबरोबर किती हा बोगसपणा आणि खोटारडेपणा. किती ही बनावाबनवी?, असे खोचक सवालही नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना केले आहेत.

दरम्यान, दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेेंनी केलेल्या भाषणामध्ये त्यांच्याकडून नामर्द, निर्लज्जपणा असे शब्द येतात. वर याची उजळणी सामानाच्या अग्रलेखातही होते. अशाप्रकारची भाषा आणि संंस्कृती महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची नसल्याचंही राणेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“गाव जेवण एक दिवस देणार की पुढची तीन वर्ष देणार”

“…तर नारायण राणेंची कुंडलीच बाहेर काढू”

“राज्याच्या मुख्यमंत्र्याचं काम शरद पवार करतात”

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ सर्वांना बोनस मिळणार

“मी शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, मेलो तरी त्यांना सोडणार नाही”