सिद्धार्थची संपत्ती ऐकूण तुम्ही देखील थक्क व्हाल, वाचा सविस्तर

मुंबई | ‘बिग बॉस’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने आज या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. सिद्धार्थच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अद्याप देखील त्याच्या चाहत्यांचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही. सिद्धार्थने अगदी कमी वयात प्रचंड लोकप्रियता आणि संपत्ती मिळवली आहे.

सिद्धार्थने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. त्याला गाड्यांची खूप जास्त आवड होती. त्याच्याकडे अनेक वेगवेगळ्या गाड्या होत्या. त्याच्याकडे BMW कार देखील होती.

सिद्धार्थने नुकतीच एक लक्झरी कार देखील खरेदी केली होती. तसेच त्याच्याकडे अनेक मोटारसायकल्स आहेत. त्याच्याकडे अनेक लक्झरीयस घरे देखील आहेत. त्याची 2020 पर्यंत नेटवर्थ तब्बल 1.5 मलियन डॉलर म्हणजेच 11 करोड इतकी आहे.

सिद्धार्थ 40 वर्षाचा असून हृदयविकारामुळे त्याला आपला अखेरचा श्वास घ्यावा लागला. सिद्धार्थ शुक्लाने काल म्हणजेच 1 सप्टेंबरच्या रात्री काही औषधं घेतली होती. त्यानंतर तो आपल्या बेडरुमध्ये झोपला. परंतु सकाळी तो उठला नाही. यानंतर त्याला मुंबईच्या कपूर रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

डॉक्टरांनी सिद्धार्थला चेक केल्यानंतर सिद्धार्थचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्यानं झाला असल्याचं सांगितलं. सिद्धार्थने 2004 साली आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरूवात केली होती.

सिद्धार्थला मॉडेलिंग आणि अभिनयामध्ये फारशी आवड नव्हती. परंतू त्याच्या लूकमुळे केवळ आईच्या सांगण्यावरून त्यानं एका मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. तिथून त्याच्या करिअरला सुरूवात झाली.

डिसेंबर 2005मध्ये तुर्कीमध्ये मॉडेलिंगची स्पर्धा झाली होती. त्यामध्ये आशिया लॅटिन, अमेरिका, यूरोपमधील एकूण 40 जणांनी सहभाग घेतला होता. या 40 जणांना मागे टाकत सिद्धार्थने जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलंच विजेते पद पटकावलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

सिद्धार्थच्या मृत्यूचे दु:ख शहनाजला असहय्य, वडिलांनी दिली तिच्या प्रकृतीबद्दल माहिती

कोणासोबत एक रात्र घालवशील? भूमी पेडणेकर म्हणते…

‘बिग बॉस’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे अकाली निधन

स्वत:च्याच लग्नात नवरीने केला भन्नाट डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ

‘धूम मचाले’ म्हणत तरूण आपल्या गाडीसह थेट शिरला घरात, पाहा मजेशीर व्हिडीओ