वांग्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

फळभाज्या म्हटलं की वांग्याचं नाव पहिलं येतं. पण याच वांग्याची भाजी खायची म्हटलं की अनेकजण नाक मुरडत असतात. अनेकांना जेवणामध्ये वांग नकोसं असतं. मात्र, वांग आपल्या शरीरासाठी किती लाभदायी आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आज जाणून घेऊयात वांग खाण्याचे फायदे.

वांग्यामध्ये नैसर्गिक स्टेरॉईड असतात. अॅथलेट्स किंवा मैदानी खेळ खेळणारे खेळाडू शरीरात जोम आणण्याकरिता बाजारात मिळणाऱ्या आर्टिफिशिअल स्टेरॉइडचा गैरवाजवी वापर करत असतात. पण हेच स्टेरॉईड वांग्यामध्ये मूलतः असते.

थोड्याफार श्रमाने थकवा येत असेल किंवा तुम्हाला तुमचे शरीर सक्षम हवे असेल तर कोवळी बिनबियांची वांगी खावीत. ही वांगी शरीरास खूप लाभदायी ठरतात. वांग्यातील बियांमुळे वृक्क किंवा मूत्रमार्गात मूत्राश्मरी बनण्याची शक्यता असते.

फुफुसांच्या आजारात किंवा कफप्रधान विकारात कोवळ्या वांग्याचा रस किंवा वांगी शिजवून फार मसाला नसलेली भाजी खावी. तसेच गळू झाले असल्यास वांगे शिजवून त्याचा शेक दिल्याने गळवे बसतात आणि पू होत नाही.

महत्वाच्या बातम्या-

“सुशांत कधीच आपल्या बेडरूमचा दरवाजा बंद करत नव्हता… सुशांतला त्याच्या स्टाफनेच मारलं”

राज ठाकरेंनी सुनील ईरावरांच्या कुटुंबियांसोबत फोनवरुन साधला संवाद, वाचा काय म्हणाले राज ठाकरे…