सोशल मीडियावर आज काल आपण अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.
काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर लहान मुली-मुलांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात.
असाच चिमुकलीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी खुर्चीवर बसलेली आहे.
त्या लहान मुलीला तिचे वडील काही पदार्थ देत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. सुरूवातीला त्या चिमुकलीला तिचे वडील चोखणी देतात. तर ती त्याना घेण्यास नकार देते. त्यानंतर तिला दुधाची बॉटल देतात ती त्यालाही नकार देते.
त्यानंतर तिचे वडील तिला नूडल्सची डिश समोर ठेवतात, ती त्यालाही घेण्याय नकार देते आणि रडायला लागते. मग तिचे वडील तिच्यासमोर परत आधी दाखवलेल्या गोष्टी एकामागून-एक दाखवतात तर रडत त्याना बाजूला सारते. शेवटी तिचे वडिल तिच्यासमोर रेड वाईनचा ग्लास ठेवतात. ते पाहून ती चिमुकली एकदम खूश होऊन हसायला लागते.
तसेच हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी ‘Sometimes one video can change your entire mood’असं कॅप्शनही दिलं आहे.
त्याचप्रमाणे हा व्हिडीओ आतापर्यंत खूप लोकांनी पाहिला असून, अनेकांनी या व्हिडीओला मजेशीर कमेंट देखील केल्या आहेत.
Sometimes one video can change your entire mood… pic.twitter.com/qoXc3OAYe5
— anand mahindra (@anandmahindra) May 22, 2021
महत्वाच्या बातम्या-
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आईचा फोन परत मिळवण्यासाठी मुलीचे…
बाळाला झोपवण्यासाठी चक्क डॉक्टरांनी गायली अंगाई, पाहा…
बाबांनी बनवला अनोखा मास्क, पाहा व्हायरल व्हिडीओ