तहानलेल्या आधुनिक काळातील कावळ्याने पाणी पिण्यासाठी लढवली ‘ही’ शक्कल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

मुंबई |  गेल्या वर्षी करोनाने जे थैमान घातलं आहे, ते आजूनही सुरूच आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर केले होते. त्या काळात अनेकांनी आपल्या कला, छंद जोपासले. त्याचे व्हिडीओही अनेकांनी सोशल मिडीयावर शेअर केले होते.

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडीओ मजेशीर असतात. तर काही व्हिडीओ विनोदी स्वरूपाचे असतात. त्यामध्ये लोक आपली कला सादर करताना आपण पाहतो. सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड अॅक्टर्सही आपले व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया आकाऊंटवरून शेअर करत असतात.

आता हिवाळा ऋतू संपूण उन्हाळा ऋतू सुरू झाला आहे. काही दिवसांपासून वातावरण जास्तच उष्ण झालं असल्याचं दिसत आहे. त्यामुळे गर्मी अधिक वाढली आहे. या दिवसांमध्ये माणसांना अनेक थंडगार पदार्थ खावेसे वाटतात. तसेच या दिवसांमध्ये आपल्याला तहानही खूपवेळा लागत असते. सतत घसा कोरडा पडतो.

या दिवसांमध्ये आपण लिंबू सरबत करून पितो. तर कधी कोल्ड्रिंग्स पित असतो. मात्र मुके जनावर, पशु-पक्षी या अशा उकाडीच्या दिवसांमध्ये त्यांचेतर किती हाल होत असतील. त्यांना तर बोलताही येत नाही. ज्या ठिकाणी पाणी दिसेल तिथे जाऊन घशाला पडलेली कोरड ते पाणी घालवायची. अशातच याचसंदर्भातील कावळ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

लहानपणी आपण कावळ्याची पाणी पिण्याची गोष्ट ऐकली होती. त्यामध्ये तो एका घागरीतील तळाला असलेलं पाणी आजुबाजूचे दगड वेचून त्यात टाकतो. जसा-जसा तो त्या घागरीमध्ये दगडाचे खडे टाकतो तसं-तसं ते पाणी हळू-हळू वरती येतं. त्यानंतर ते पाणी पिऊन तो आपली तहान भागवतो.

असंच काहीस या व्हायरल व्हिडीओतील तहानलेल्या कावळ्यानं केलं आहे. परंतू हा आधुनिक काळातील कावळा असल्याचं समजत आहे. एक तहानलेला कावळा एका नळाच्या पाईपावर बसला आहे आणि तो त्या पाईपाची नळ  उघण्याचा प्रयत्न करताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.

काही वेळानंतर तो कावळा नळ सुरू करण्यात यशस्वी होतो. नळ सुरू करताच पाण्याची धार लागते आणि कावळा आपल्या चोचिने पाणी पितो, असं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतं आहे. हा व्हिडीओ सगळ्यांना एक प्रेरणा देणार आहे.

हा व्हायरल व्हिडीओ मारटिन नाव असलेल्या एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना मारटिनने ‘let the clever crow show you how to get tap water’ असं कॅप्शन दिलं आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 47 हजार लोकांनी पाहिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

काय सांगता! वजन वाढल्याने मांजरालाही आलं टेन्शन, पाहा…

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दिसणार नव्या भूमिकेत,…

स्वप्नांना लागली कोरोनाची नजर! पुण्यात…

प्रेक्षकांना पोटभोर हसवणाऱ्या कपिल शर्मानं केलं आपल्या…

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर अभिनेत्री कंगना राणौतचा…