Top news

10 वर्षाच्या चिमुकलीचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल सुन्न

Photo Credit- Twitter/@MiddleEastEye

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आपण व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर लहान मुला-मुलींचे अनेक विनोदी, तर कधी-कधी सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूटही असतात.

तसेच आपल्याला माहित आहे की इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील दहशतवादी गट हमास यांच्यात सध्या युद्धाचं वातावरण आहे. याबद्दलच्या बातम्या अनेक माध्यमांमधून आपल्याला पाहायला, ऐकायला मिळत असतात.

इस्रायल गाझा पट्टीतील विविध इमारतींवर क्षेपणास्र हल्ले करत आहे आणि त्यामुळे तिथल्या इमारती कोसळत आहेत. याच संदर्भातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतू पॅलेस्टईनमधील एका चिमुकलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील मुलगी केवळ 10 वर्षाची असल्याचं समजतं आहे. तसेच त्या मुलीचं नाव नादिन अब्देल-तैफ आहे. नादिन अब्देल-तैफ ही इस्रायली हल्ल्यांमुळे कोसळलेल्या पॅलेस्टाइनमधल्या इमारतींच्या परिसरात राहतंं असून, तिने कोसळलेल्या इमारतींची व्यथा मांडली आहे.

मी खूपच चिंतेत आहे. मला काय करायचं हेच कळत नाहीए. आणि तुम्ही माझ्या आजुबाजूला हे बघताय (असं म्हणत ती आजाबाजूच्या कोसळलेल्या इमारतींचा राडारोडा दाखवते आणि विचारते) यात मी काय करू शकते? मी हे सगळं ठीक करावं?मी कसं हे सगळं ठीक करणार मी फक्त 10 वर्षांची आहे. मी या परिस्थितीशी यापेक्षा अधिक लढू शकत नाही. व्हिडीओमध्ये नादिन असं म्हणतं आहे.

तसेच व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ‘मिडल इस्ट आय’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटलवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, त्या मुलीची व्यथा ऐकून अनेकांना आपले अश्रु अनावर झाले आहेत. तर काही सुन्न झाले आहेत.

त्याचप्रमाणे या व्हिडीओला अनेक कमेंट येत असून, आतापर्यंत हा व्हिडीओला जवळजवळ 12 लाख लोकांनी पाहिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

गाडी चालवताना अचानक समोर आला भलामोठा हत्ती अन्…, पाहा…

पुढील काही तासांत मुंबईसह ‘या’ भागात होणार…

भयानक चक्रीवादळातही ‘ती’ महिला पावसात भिजत मारत…

घरात जागा नाही म्हणून ‘तो’ चक्क 11 दिवस झाडावर…

लग्नातील वऱ्हाड्यांची तुफान हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ