मुंबई | अनेक लोकांना पाळीव प्राणी पाळण्याचा खूप शौक असतो. त्यातील बरीचशी लोकं कुत्र्याला पाळतात. आपल्याला माहित आहे की कुत्रा हा इमानदार प्राणी म्हणून ओळखला जातो.
कुत्र्याला आपण जीव लावला तर तोही इतकाच जीव आपल्या मालकाला लावत असतो. तो नेहमी खाल्लेल्या मीठालाही जागतो.
याच्याशीच निगडीत असलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा झोपलेल्या एका लहान मुलाजवळ जातो आणि जे कृत्य करतो. तो पाहून तुम्हालाही धक्का बसणार आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही लहान मुलं झोपलेली आहेत.
त्या ठिकाणी एक कुत्रा येतो आणि त्यांच्याजवळ जातो. आपल्याला असं वाटेल की, तो कुत्रा त्या लहान मुलांना चावेल किंवा जोरजोरात भुंकायला लागेल. परंतू यापैकी तो काहीही करत नाही.
उलट ज्याप्रमाणे आपली आई आपलं मुलं झोपलं असतानाही कशाचाही आवाज होऊ देत नाही. मुलं नीट झोपली आहेत की, नाही हे सतत पाहत असते. अगदी त्याचप्रमाणे तो कुत्राह ती लहान मुल नीट झोपली आहे की नाही हे तो पाहत असल्याचं समजतं आहे.
कुत्र्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून त्या कुत्र्याचं अनेकांनी कौतुक देखील केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
काय सांगता! माणसांप्रमाणे चक्क पक्षीही करतोय चोरी, पाहा व्हिडीओ
ओव्हरटेक करायला गेला अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ
‘मी नास्तिक आहे, धर्मामुळे माझी…’; सैफ अली खानचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
‘पती पत्नी और वो’ नवऱ्याला बायकोनं पकडलं रंगे हात, पाहा व्हायरल व्हिडीओ
‘इंडियन आयडॉल 12’ मधील सर्वांची लाडकी जोडी KBC मध्ये लावणार हजेरी, व्हिडीओ व्हायरल