मुंबई | आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. ललित मोदी यांचं यावेळेस चर्चेत येण्याचं कारण देखील अगदी खास आहे. ललित मोदी यांनी काही फोटो शेअर करत ते माजी मिस यूनिव्हर्स व बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचा खुसाला केला आहे.
ललित मोदी देशातील आघाडीच्या व्यावसायिक घराण्यातील असून त्यांचं व्यापारी जगतात मोठं नाव आहे. दुसरीकडे मिस युनिव्हर्स म्हणून प्रकाश झोतात आलेल्या सुष्मिता सेनने बॉलिवूडमध्ये देखील खूप नाव कमावलं आहे.
कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक असलेले ललित मोदी व सुष्मिता सेन यांची संपत्ती ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुष्मिता सेन दर महिन्याला 60 लाख रूपये कमवत असून तिचं वार्षिक उत्पन्न हे तब्बल 9 कोटी आहे.
ललित मोदींच्या नावे 4,555 कोटींची संपत्ती असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. तर लंडनच्या आयकॉनिक 117 स्लोएन स्ट्रीट येथे ललित मोदींची पाच मजली हवेली आहे जी 7000 स्क्वेअर फूटमध्ये पसरली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सुष्मिताची एकूण संपत्ती 74 कोटी आहे. तसेच तिच्या नावे कोट्यवधींच्या गाड्या देखील आहेत. सुष्मिता तिच्या दत्तक मुलीसोबत मुंबईतील वर्सोवा येथील एका अलिशान अपार्टमेंटमध्ये राहते.
एका चित्रपटासाठी सुष्मिता सेन 3 ते 4 कोटींचं तर ब्रँड एंडोर्समेंटसाठी सुष्मिता साधारण 1.5 कोटींचं मानधन घेते. चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये कामाव्यतिकिक्त सुष्मिताची एक तंत्र एंटरटेनमेंट नावाची कंपनी देखील आहे. शिवाय सुष्मिता दुबईमध्ये रिटेल ज्वेलरी स्टोअर देखील चालवते.
दरम्यान, 2010 साली मनी लाँड्रिंगचे आरोप झाल्यानंतर ललित मोदी देश सोडून सध्या लंडन येथे राहतात. त्यानंतर भारत सरकारने त्यांना फरार घोषित केलं आहे. सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची कबूली दिल्यानंतर हे सेलिब्रिटी कपल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारकडून स्थगिती
देवेंद्र फडणवीस आज राज ठाकरेंची भेट घेणार, ‘या’ मुद्द्यांवर महत्त्वाची चर्चा होणार?
राज्यात पावसाचा जोर ओसरणार मात्र दोन दिवस महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
शरद पवारांनी शिवसेना फोडली म्हणणाऱ्या केसरकरांना अजित पवारांचा प्रेमाचा सल्ला, म्हणाले…
अभिनेत्री सुष्मिता सेनने ललित मोदीसोबत संसार थाटला?, फोटो सोशल मीडियावर व्हायरल