‘ए जानू चल झाडू मार’; शिल्पा आणि राजचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
मुंबई | वर्षभरापूर्वीपासून कोरोना महामारीनं संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. या महामारीमुळे सर्वांच्या नाकी नऊ आलं आहे. मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं सर्व काही पूर्वावस्थेत येऊ लागलं होतं. मात्र, पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढल्याने महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
गेल्यावर्षी याच महिन्यात देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं. यावेळी सर्व कलाकारांनी सोशल मिडियावर वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत प्रचंड धमाल केली होती. अशातच आता पून्हा एकदा मिनी लॉकडाऊन जाहीर केल्यानं कलाकारांनी मजा मस्तीचे व्हिडीओ शेअर करण्यास सुरुवात केली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि तिचा पती राज कुंद्रा देखील सोशल मिडियावर चांगलेच ऍक्टिव्ह असतात. ते सतत सोशल मिडियावर काही न काही शेअर करत असतात. मिनी लॉकडाऊन लागू होताच या दोघांनी देखील सोशल मिडियावर धमाल करण्यास सुरुवात केली आहे.
राज कुंद्रा यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत त्यांनी लिहिलं आहे की, लॉकडाऊन पुन्हा एकदा सुरू होत आहे. पुन्हा घरी काम करण्यास सुरुवात होत आहे. देवा आम्हाला मदत कर.
राज कुंद्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शिल्पा शेट्टी आपल्या घरात सफाई करत आहे. शिल्पा घराची साफसफाई करताना राज कुंद्रा एका खुर्चीवर आरामशीर बसलेला दिसत आहे. शिल्पा काम करून खूप वैतागलेली असते.
शिल्पा आपल्या नवऱ्याला म्हणते, ए जानू चल झाडू मार. यावर राज तिला उत्तर देतो की, मे नही मारुंगा. पण पूढे शिल्पा त्याला म्हणते की, आखरी बार बोल रही हूं झाड़ू मार. मग राज देखील हातात झाडू घेतो आणि म्हणतो की, ठीक है तुम कहती हो तो मैं ये कर रहा हूं.
यानंतर राज हातात झाडू घेतो आणि शिल्पाला जोरात झाडू मारतो. राजने शिल्पाला झाडू मारताच तो पळत सुटतो. हाच सीन पाहून चाहते पोट धरून हसतात. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, राज आणि शिल्पाचा हा व्हिडीओ एक वर्षांपूर्वीचा आहे. यापूर्वी देखील त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला होता. मात्र, पुन्हा एकदा मिनी लॉकडाऊन लागू होताच राज कुंद्रा यांनी पुन्हा हा व्हिडीओ रिपोस्ट केला आहे.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या –
आता माझी सटकली! संतापलेला कुत्रा मालकासमोर गेला अन्…; पाहा व्हिडीओ
‘मिशन मजनू’च्या सेटवर दुर्घटना! सीन करताना अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला झाली दुखापत
अभिनेत्री करिना कपूरच्या ‘या’ मास्कची सर्वत्र…
तरूणाने हाताऐवजी तोंडात धरला चिप्स अन्, पुढे जे घडलं ते…
तरूणाने केला हवेत खतरनाक स्टंट, व्हिडीओ पाहून तुमच्याही…