भररस्त्यात छेड काढल्यानं तरुणीला बेदम चोपलं, पाहा ‘डॅशिंग बॉयचा’ व्हिडीओ

नवी दिल्ली | आजकाल देशात मुलींच्या छेडछाडीचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. रोजच मुलींच्या छेडछाडीच्या अनेक बातम्या, व्हिडीओज समोर येताना दिसतात. मात्र, आता एका मुलीनेच मुलाची छेड काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका तरुणीने शेरेबाजी करत भररस्त्यात तरुणाची छेड काढली. यामुळे संतापलेल्या तरुणाने तिला चांगलाच चोप दिला. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. सध्या हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही घटना उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथील मेट्रो स्टेशन परिसरात घडली आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक तरुण तरुणीला चांगलाच चोप देत आहे. हा तरुण रागाने लालबुंद झालेला आहे.

एक तरुण मुलीला मारत असल्याचं पाहून घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. तरुणी मदतीसाठी उपस्थितांकडे याचना करत आहे. परंतु या तरुणीच्या मदतीसाठी कोणीच पुढे सरसावत नाही. कोणीतरी मला वाचवा, अशी विनवणी ही तरुणी करत आहे.

काही लोक तरुणाला समजावण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु तो तरुण कोणाचेच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. छेड काढणाऱ्या तरुणीला तो बुक्क्यांनी मारहाण करत राहतो.

काही वेळाने दुसरा एक तरुण या वादात मध्यस्थी करतो आणि तरुणीला त्या युवकाच्या ताब्यातून सोडवतो. पुढे हा तरुण मुलीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून तिथून निघून जातो. सौरभ शुक्ला नावाच्या व्यक्तीने त्याच्या ट्वीटर अकाऊंवटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं होतं. यानंतर या तरुणाने पोलिसांना सर्व घडलेला प्रकार सांगितला. अद्याप त्या तरुणीने युवकाविरुद्ध तक्रार दाखल केली नसल्याने तरुणाला सोडण्यात आलं.

https://twitter.com/CsSaurabhshukla/status/1437657126629896192?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1437657126629896192%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fviral%2Fa-young-boy-beats-girl-video-goes-viral-aj-604757.html

महत्वाच्या बातम्या-

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर त्याचा खास मित्र अभिनव प्रथमच व्यक्त झाला, म्हणाला…

अखेर अमिताभ बच्चन यांनी आपल्या पहिल्या प्रेमाबाबत सोडलं मौन, म्हणाले…

पैसाही गेला अन् लेकही दुरावली, रानू मंडल पुन्हा रस्त्यावर!

…अन् त्या माऊलीने आपल्या मुलासाठी गरोदरपणात कापला पाय, वाचा सविस्तर

प्रेमासाठी ‘या’ राजकुमारीनं सोडली राजगादी, सर्वत्र होतंय कौतुक