“तुमच्या कटकारस्थानाच्या स्वप्नाची पूर्तता होणार नाही”

मुंबई |  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्यातील राजकारणात एक वादाची ठिंणगी पडली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघालं आहे.

विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये या मुद्यांवरुन आ.रोप-प्रत्यारोपाची खेळी चांगली रंगलेली पाहायला मिळत आहे. विरोधी पक्ष वारंवार महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी करत आहेत. भाजपचे शिष्टमंडळ मुंबईतील राजभवात दाखल झाले. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.

त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यपालांना भेटल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अस्थिर असल्याचं ते म्हणाले होते. तसेच महाविकास आघाडीने सर्व नैतिकता पायाखीली तुडवली आहे. केवळ सत्तेसाठी या ठिकाणी हे सर्व काम चाललं आहे. त्यापलीकडे काहीही नाही, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं.

त्यांच्या या वक्तव्याला  मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

राज्यपालांच्या भेटीनंतर महाविकास आघाडी अस्थिर झाली असल्याचं सांगितलं जात आहे. परंतू राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर नाहीतर खंबीर आहे, तुमच्या कटकारस्थानाच्या स्वप्नाची पूर्तता होणार नाही, असं म्हणत नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच टोला लगावला आहे.

राज्य सरकार अस्थिर करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी राष्ट्रपती राजवट लागू करणार नाही. महाविकास आघाडीकडे बहुमत असल्याचंही नवाब मलिक म्हणाले आहेत.

रश्मी शुक्ला यांच्या रिपोर्टच्या आधारावर देवेंद्र फडणवीस सरकारला बदनाम करण्याचे काम करत होते. कालच फडणवीसांचे असत्य आणि सत्य काय आहे हे जनतेसमोर आले आहे. भाजपला सत्तेशिवाय राहता येत नाही म्हणून ते सगळे उपद्रव करत आहेत, असंही टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

दरम्यान,  राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काहीनाकाही सुरुच असते. पुन्हा येण्यात अनेकदा अपयश येऊनही प्रयत्न न सोडण्याची त्यांची जिद्द बघता कौतुकही करवं वाटतं, असं म्हणत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

आज सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पाहा…

‘काम हवं असेल तर……’ अंकिता लोखंडेचा…

मोठी बातमी! बीड जिल्ह्यात ‘इतके’ दिवस लॉकडाऊन…

“मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी बोलतं…

आज मध्यरात्रीपासून ‘या’ जिल्ह्यात 11 दिवसांचं…