मुंबई | कोरोना काळापासून अनेकांनी आपल्यातले कलागुण जोपासायली सुरूवात केली आहे. ही खरच खूप चांगली गोष्ट आहे. काही जण आपली पाक कला जोपसतात, तर काहीजण आपल्या अंगात असलेली कला अवगत करतात. यादरम्यान खूप व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत.
त्याचप्रमाणे सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. त्यात काही व्हिडीओ विनोदी असतात, तर काही भावूक करणारे असतात. सर्वसामान्य लोकांपासून ते सुपस्टार अभिनेत्री-अभिनेता यांच्यापर्यंत अनेकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
याआधी आपण अनेक प्रकारचे स्टंट केलेले व्हिडीओ पाहिले असतील. परंतू स्ध्या एका तरूणाचा हवेत स्टंट केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खुप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तुम्ही पाहताना तुमच्या हृहयाचे ठोके वाढल्याशिवाय राहणार नाही.
व्हायरल व्हिडीओमध्ये तरूण एका मोकळ्या मैदानावर उभा आहे. त्याच्या काही अंतरावर दोन खुर्च्या आणि एक पाण्याने भरलेले भांडे दिसत आहे.
तो तरूण काही अंतरापर्यंत धावत येताना दिसत आहे. त्यानंतर तो उंच उडी मारत हवेत गोल फिरताना दिसत आहे. हवेत कोलांटी उडी मारत तो तरूण त्या खुर्च्यांवर ठेवलेल्या त्या भांड्यातील पाण्यात आपलं डोकं बुडवतो आणि आणखी एकदा कोलांटी उडी मारून खुर्चीच्या पलीकरडे जाऊन उभा राहतो, असं या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ आयपीएस अधिकारी दिपांशू कबरा यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअक करताना ‘ Everything seems impossible until it’s done’ असं कॅप्शन दिलं आहे. त्याचबरोबर लोकांनी ही स्टंट करण्याचा प्रयत्न करू नये, अशी चेेतावणीही दिपांशू कबरा यांनी व्हिडीओ पोस्ट करताना दिली आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, आतापर्यंत या व्हिडीओला जवळजवळ 5 हजार लोकांनी पाहिलं आहे. या व्हिडीओतील तरूणाची करामत पाहून सर्वच नेटकरी अचंबित झाले आहेत. तरूणाची आपल्या शरिरावर असलेली पडक आणि त्यांनी केलेल्या स्टंटची सर्वांकडून कौतुक केलं जात आहे.
Everything seems impossible until it’s done.#MondayMotivation
Note – Never try this. (Especially without safety gears) pic.twitter.com/gt8080cA4m
— Dipanshu Kabra (@ipskabra) April 5, 2021
महत्वाच्या बातम्या-
केस कापताना तो ओक्साबोक्सी रडू लागला, व्हिडीओ पाहून तुम्ही…
अजून बोलताही येत नाही तोच पोरगं म्हणतंय गाणं, पाहा…
मंदिराच्या दानपेटीत टाकला होता कंडोम, एक रक्ताच्या उलट्या…
दयाबेनला पहिल्या शोसाठी मिळाले होते फक्त ‘इतके’…
भारतातील ‘या’ शहरात 100 वर्षांसाठी लॉकडाऊन…