क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती केलं होतं तरुणाला; त्यानं उचललेल्या पावलानं प्रशासन हादरलं!

जळगाव | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर्स उभारण्यात आली आहेत. या सेंटर्समधून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. जळगाव मधील पाचोऱ्यातील साईमोक्षा क्वारंटाईन सेंटर मधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या क्वारंटाईन सेंटरमध्ये 33 वर्षीय युवकाने रात्री उशिरा गळफास घेऊन आत्महत्त्या केली आहे.

हा युवक 19 जुलै रोजी क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल झाला होता. त्याचे स्वॅब तपासण्यासाठी 20 जुलै रोजी घेण्यात आले होते. त्याचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.

दरम्यान, घटनास्थळी रात्री साडे तीनच्या सुमारास प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसिलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे आणि डॉ. अमित साळुंखे यांनी पाहणी केली. या युवकाच्या आत्महत्येच कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.

सदर युवकावर शासकीय प्रोटोकॉल्सप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. याप्रकरणी पोलीस तपासणी करत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. युवकाच्या आत्महत्येमुळे क्वारंटाईन सेंटर मधील इतर लोक भयभीत झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

महाविकास आघाडी सरकारला सुरुंग लावण्याचे प्रयत्न; ‘या’ महिन्यात होणार सत्तापालट?

नरेंद्र मोदींनी ‘या’ मराठी माणसावर दाखवला विश्वास; सुपूर्द केली ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी

जिच्यासोबत बहिण म्हणून काम केलं, तिच्यासोबतच ‘या’ अभिनेत्यानं लग्न केलं!

धक्कादायक! मांत्रिकाने चक्क मुलीच्या कुटुंबियांसमोर केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

केरळनंतर राजस्थानमध्ये माणुसकीला काळीमा; उंटासोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य