मुंबई | काय झाडी, काय डोंगार आणि काय हाटेल या डॉयलॉगमधून गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेले शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
गेले अनेक दिवस पाटील शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेनेवर टीका करत आहेत. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी आणि शहाजी बापू पाटील यांच्यात मोठा वाद पेटला असून टीका प्रतिटीकांच्या फैऱ्या झडत आहेत.
युवासेनेचे पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख गणेश इंगोल (Ganesh Ingol) यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले आहे. शहाजी बापू पाटील यांनी नुकतीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली होती.
मी उद्धवसाहेब आणि आदित्यसाहेब यांना सांगोल्यात दोन बंगले भाड्याने घेऊन देतो. माझ्यावर जितके लक्ष ठेवायचे तेवढे ठेवा आणि मला पाडायचे असेल तर पाडा, असे आव्हान त्यांनी ठाकरे यांना दिले होते.
याला प्रत्युत्तर देताना, युवासेनेने म्हंटले आहे, बापू मतदार संघात लक्ष घाला, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा. काय दारु, काय चकणा, काय ते 50 खोके… एकदम ओके, बापू तुम्हाला मातोश्रीवर नोकरी मिळेल, आम्ही शिवसैनिक तुमची शिफारस करु, टक्केवारी घेऊन आधी स्वत: चे घर पूर्ण करा. स्वत:च्या बायकोला 50 खोक्यांतून साडी घेऊन द्या, असे ट्विट युवासेनेने केले आहे.
आता शहाजी बापू पाटील यांना युवासेेनेने थेट प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे युवासेनेचा बाण त्यांच्या वर्मी लागला आहे.
महत्वाच्या बातम्या –
काँग्रेसचा नवीन अध्यक्ष महाराष्ट्रातून? नाना पाटोलेंसह ‘या’ नेत्यांच्या नावाची चर्चा
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मेळघाट दौरा गाजतोय, फोटो सोशल मिडियावर व्हायरल
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण, वाचा आजचे ताजे दर
दाऊदला पकडण्यासाठी एनआयए सज्ज, केली मोठ्या बक्षिसाची घोषणा
शिवसेनेच्या ‘दसरा मेळाव्याबाबत’ नारायण राणेंचा मोठा दावा, म्हणाले…