मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवावी, अशी इच्छा शिवसेना आमदार अनिल परब यांनी बोलून दाखवल्यानंतर युवासेनेला स्फुरण चढलं आहे. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी पोस्टरबाजी करण्यात येत आहे.
संपूर्ण वरळी परिसरात आदित्य ठाकरे यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. ‘हीच ती वेळ आहे , नवा महाराष्ट्र घडवायची’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. ठाकरे कुटुंबाची तिसरी पिढी निवडणुकांच्या मैदानात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. ठाकरे कुटुंबातून निवडणूक लढवणारे आदित्य हे पहिलेच सदस्य असतील.
आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभेची निवडणूक लढवावी आणि राज्याचं नेतृत्व करावं, अशी मागणी वरळी मतदारसंघातील गटप्रमुखांनी केली होती. ही मागणी अनिल परब यांनी उचलून धरली. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावे, अशी मनिषाही त्यांनी व्यक्त केली. आदित्य ठाकरेंना एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने जिंकून आणणार, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेशही वरळीत शिवसैनिकांना देण्यात आले आहेत. यापूर्वी युवासेनेने आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर शिवसैनिकांनीही आपली इच्छा बोलवून दाखवली होती. अनिल परब यांच्या मागणीचं आमदार सुनिल शिंदे आणि सचिन अहिर यांनी स्वागत केलं.
महत्वाच्या बातम्या-
विनाअनुदानित गॅस सिलेंडर महागला; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! – https://t.co/LTnDJQu05l #बजेटकोलमडलं
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 1, 2019
माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी विष्ठा खावी; सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली https://t.co/hBW9bPHPYg @Sadabhau_khot @rajushetti
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 1, 2019
काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मेगागळती पण भाजपमध्ये मेगाभरती नाही; मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण – https://t.co/2gQJRPLsQQ @Dev_Fadnavis @NCPspeaks @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 1, 2019