खेळ

धोनीच्या सेमीफानलच्या खेळीवरून युवराजच्या वडिलांचा अतिशय गंभीर आरोप!

चंदीगड |  माजी क्रिकेटर युवराज सिंह याच्या वडिलांनी कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीवर त्याने केलेल्या सेमी-फायनलच्या खेळीवरून अतिशय गंभीर आरोप केले आहेत.

महेंद्रसिंग धोनी मोठा खेळाडू आहे, हे मला माहितीये. पण त्याला एवढीही अक्कल नाहीये की नवीन येणाऱ्या खेळाडूला तो मोठे फटके खेळायला लावतो आणि स्वत: मात्र अतिशय संथ गतीने खेळतो. धोनी सेमीफायनलमध्ये मुद्दाम संथ गतीने खेळला, असा गंभीर आरोप योगराज सिंह यांनी धोनीवर केला आहे.

‘एएनआयएस’ या यूट्यूब चॅनेलला योगराज सिंह यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी महेंद्रसिंग धोनीवर आरोप करत जहाल टीका केली आहे.

रविंद्र जाडेजा येतो आणि त्याच खेळपट्टीवर मोठे फटके खेळतो. चौकार लगावतो… षटकार लगावतो… आणि एक धावही अगदी आरामात घेतो. याउलट दुसरा फलंदाज(धोनी) अतिशय हळू खेळतो जपून-जपून खेळतो. आणि सहकारी फलंदाजाला सांगतो की तू मोठे फटके खेळ… एवढं क्रिकेट खेळलाय तरी त्याला अक्कल नाही काय करायला हवं आणि काय करायला नको, अशी टीका त्यांनी केली आहे.

धोनीने सेमी-फायनलच्या मॅचमध्ये जसं केलं तसं युवराजने एकदा तरी केलं का? असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या अगोदरही युवराजला संघाबाहेर ठेवण्यात योगराज यांनी धोनीलाच जबाबदार धरलं होतं. मागील काही दिवसांपासून ते धोनीवर सातत्याने टीका करत आहेत.

IMPIMP