नवी दिल्ली | अष्टपैलू खेळाडू अंबाती रायडूच्या निवृत्तीवरून युवराज सिंगच्या वडिलांनी भारताचा कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी याच्यावर जहरी टीका केली आहे. एक दिवस धोनीसारखी घाण साफ होणार आहे. निवड समितीमध्ये कधी ना कधी चांगले लोक येतील. चांगला कर्णधार येईल, अशा शब्दात त्यांनी धोनीवर निशाणा साधला आहे.
अंबाती रायडूने निवृत्ती जाहीर केली. हे ऐकून मला धक्काच बसला. रायडू हा प्रतिभावंत खेळाडू असून निवड समितीच्या निर्णयाचा त्याला फटका बसला, असं युवराज सिंगच्या वडिलांनी म्हटलं आहे.
रायडू तू हरू नको. तुझा निर्णय तू बदल. पुन्हा एकदा तू मैदानात माघारी ये… चांगला खेळ कर आणि तुझी गरज संघाला दाखवून दे, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या आधीही युवराजच्या वडिलांनी सातत्याने धोनीवर जहरी टीका केली आहे.