ट्विटरवर #युवराज_सिंह_माफी_मांगो का ट्रेंड होतंय?, जाणून घ्या कारण

मुंबई | टीम इंडियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंहने इंस्टाग्राम लाईव्हमध्ये जातीवाचक शब्द वापरल्याने चाहते नाराज झाले आहेत. त्यानंतर ट्विटरवर #युवराज_सिंह_माफी_मांगो हा ट्रेंड सुरु करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी युवराज सिंह इंस्टाग्रामवर टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माबरोबर लाईव्ह चॅट करत होता. यावेळी दोन्ही खेळाडूंनी क्रिकेट, कोरोना आणि इतर अनेक विषयांवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि गोलंदाज कुलदीप यादव यांचा उल्लेख होता.

युजवेंद्र चहल सध्या आपल्या कुटुंबासह नेहमी व्हिडिओ पोस्ट करत असतो, याची चर्चा करताना युवराजने विनोदी शैलीत त्याच्यावर टिप्पणी केली. मात्र यामध्ये जातीवाचक उल्लेख झाल्याने अनेकांचा संताप झाला. यावरुन युवराज सिंहने जाहीर माफी मागावी, अशी मागणी ट्विटरवर केली जात आहे.

दरम्यान, काही जणांनी मात्र युवराजला पाठींबा दर्शवला आहे. युवराज हलक्याफुलक्या पद्धतीत मित्राशी बोलत होता. इतक्या लहान गोष्टी लोकांनी मनाला लावून घेऊ नयेत, अशी भूमिका काही जणांनी घेतली आहे.

 

 

 

महत्वाच्या बातम्या-

-रेल्वेत एकाही प्रवाशाचा अन्न-पाण्यावाचून मृत्यू झालेला नाही; रेल्वेमंत्र्यांचा दावा

-कोरोनाविरोधी लढ्यात केरळची महाराष्ट्राला मोलाची मदत, मुख्यमंत्री-आरोग्यमंत्र्यांनी मानले आभार

-कोरोनाच्या संकटकाळात 30 हजार दिव्यांगांसाठी मुंबई महापालिकेचं मोठं पाऊल

-कोरोनाच्या संकटकाळात 30 हजार दिव्यांगांसाठी मुंबई महापालिकेचं मोठं पाऊल

धारावीत अवघ्या 15 दिवसांत कोविड रूग्णालय बांधून तयार, आरोग्यमंत्र्यांनी केली पाहणी