अभिमानास्पद! युवराज सिंगची ‘ती’ खास बॅट अंतराळात पोहोचली; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | भारताचा माजी स्टार अष्टपैलू खेळाडू म्हणजेच सिक्सर किंग युवराज सिंगने भारतीय क्रिकेटसाठी अमुल्य योगदान दिलं आहे.

भारतासाठी मिडल ऑर्डरमध्ये धुवांधार फटकेबाजी करणाऱ्या आणि अवघड परिस्थितीतून सामना जिंकवणाऱ्या युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे.

अशातच युवराज सिंगची ऐतिहासिक बॅट अंतराळात पाठवण्यात आली आहे. 2003 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यात ढाकामध्ये युवराजनं पहिलं शतक झळकावलं होतं.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ज्या बॅटने युवराजने शतक झळकावलं होतं ती बॅट युवराजने जपून ठेवली होती. तीच बॅट आता अंतराळात पोहचली आहे.

आशियातील एनएफटी बाजार कोलेक्सियन आणि माजी भारतीय क्रिकेटरच्या सहकार्याने एक उपक्रम आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी युवराजने या कंपनीसोबत करार केला.

या करारानुसार आता युवीची बॅट अंतराळात पाढवण्यात आली आहे. अंतराळात पाठवण्यात आलेली ही पहिलीच बॅट आहे. लवकरच याचा व्हिडीओ देखील समोर येईल.

कोलेक्सियनसोबत करार करून मी खूश आहे, कारण मी आपल्या क्रिकेटच्या प्रवासादरम्यान मिळालेल्या या मौल्यवान वस्तू, ज्या लोकांनी माझ्यावर नेहमीच प्रेम केलं आणि मला सातत्यानं प्रोत्साहित केलं त्यांच्यासोबत शेअर करू शकेल, असं युवी म्हणाला आहे.

दरम्यान, माझ्या शतक झळकावलेल्या बॅटसह, आणखी काही अत्यंत मौल्यवान वस्तूही शेअर करण्यास उत्सूक आहे, असंही युवी म्हणाला आहे.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या- 

अजित पवार म्हणतात, “तो राज्यपालांचा अधिकार पण ज्या परंपरा…”

फुटबाॅलच्या मैदानात दुर्दैवी घटना; खेळाडू गोलकिपरला धडकला अन्…; पाहा व्हिडीओ

“वडिलांनी सांगितलंच होतं, आज काहीतरी वाईट होणार”, जग्गूदादाचा मोठा खुलासा

शाळा उघडताच कोरोनाचा शिरकाव; तब्बल 33 जणांना कोरोनाची लागण

“असं काही घडू नये, पण घडलंच तर…”, अजित पवारांचं मोठं वक्तव्य