खेळ

‘झी टॉकीज’ आणि ‘कलर्स मराठी’मध्ये मोठा वाद; शरद पवारांची मध्यस्थी

‘झी टॉकीज’ आणि ‘कलर्स मराठी’ या दोन मराठी वाहिन्यांमध्ये कुस्ती स्पर्धेच्या आयोजनावरुन जोरदार वाद सुरु आहे. या वादात कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. 

शरद पवार यांनी नेमकं काय केलं?

दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीच्या स्पर्धांचं आयोजन केलं आहे. यावर शरद पवारांनी पुण्यात कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. या बैठकीला दोन्ही वाहिन्यांचे प्रतिनिधी हजर होते.

कुस्तीगीर परिषदेकडे आलेले दोन्ही प्रस्ताव वेगवेगळ्या स्वरुपाचे आहेत. त्यामुळे दोन्हींना मान्यता द्यायला हरकत नाही. फक्त कोणती आधी भरवायची हा प्रश्न आहे. एक समिती तयार करुन यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

काय आहे प्रकार?

दोन स्पर्धक वाहिन्यांवर एकाच वेळी सारख्याच पद्धतीचे शो भरवले जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही डान्स, संगीत, विनोद अशा विषयांवरील रिअॅलिटी शो दोन वेगवेगळ्या चॅनल्सवर एकाच वेळी प्रक्षेपित करण्यात आलेले आहेत. ‘झी टॉकिज’ने महाराष्ट्र कुस्ती लीग आयोजित केली आहे, तर कलर्स मराठी वाहिनी ‘रेसलिंग चॅम्पियनशिप’ आयोजित केली आहे. त्यामुळे दोन्ही वाहिन्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे.