आता दारु प्रेमींना मिळणार घरपोच दारु; झोमॅटो देणार होम डिलिव्हरी

मुंबई : देशात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर दारुची दुकानं बंद करण्यात आली होती. जवळपास 40 दिवसांनंतर 4 मे रोजी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात देशात काही भागातील दारुची दुकानं सुरु करण्यात आली होती. दुकानं सुरु करताच दुकानाबाहेर दारुप्रेमींनी मोठमोठ्या रांगा लावल्या. यावेळी दारुप्रेमींनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला . त्यामुळे दारुची दुकानं उघडल्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला.

परंतु खूप दिवसाच्या लॉकडाऊनमुळे दारुच्या मागणीमध्ये मात्र चांगलीच वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या संधीचा फायदा घेत दारुवर 70 टक्के विशेष कोरोना टॅक्स लावला आहे. आता झोमॅटोही या संधीचा फायदा घेत आहे.

सध्या देशात दारुची होम डिलिव्हरी करण्यासाठी कोणताही कायदा नाही. वेगवेगळ्या राज्यात दारु पिण्यासाठीवेगळा कायदा आहे. पण घरपोच दारु संबंधित राज्य सरकारने कायदा करावा, असं मत उद्योग संघटना इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाईन असोसीएशन ऑफ इंडिया (ISWAI) च्या संबंधित सदस्यांनी मांडले आहे.

“सरकारने राज्याला घरोघरी दारु पोच करण्यास परवानगी द्यावी. जेणेकरुन लॉकडाऊनमध्ये राज्यातील महसूल वाढेल”, असं मत ISWAI चे कार्यकारी अध्यक्ष अमृत सिंह यांनी व्यक्त केले.

“जर टेक्नॉलॉजीच्या मदतीने दारुची डिलिव्हरी केली.  तर दारु विक्री चांगल्या प्रकारे होऊ शकते. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण कमी आहेत अशा ठिकाणी आम्ही दारु घरपोच देण्याचा विचार करत आहे”, असं झोमॅटोचे सीईओ मोहित गुप्ता यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

-सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्या ‘या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यक्षमतेवरच देवेंद्र फडणवीस यांचं प्रश्नचिन्ह

-मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी टोचले सरकारचे कान

-परप्रांतीय गावी गेल्याने उपलब्ध रोजगार स्थानिकांना द्या; राज ठाकरेंची मागणी

-लॉकडाऊन शिथील करायच्या वेळी तुमचा प्लॅन काय असणार? राज ठाकरेंचा सरकारला सवाल