कोरोनाच्या नावाखाली महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचार करत आहे- चंद्रकांत पाटील

पुणे |  कोरोनाने सध्या सगळीकडे हैदोस घातला आहे. राज्य सरकार अनेक उपाययोजना राबवत कोरोनाचा संसर्ग टाळण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र राज्यात राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. विरोधी पक्षाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप केला आहे. दूधदरवाढीच्या आंदोलनात मावळमध्ये सहभागी होऊन त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, याप्रसंगी पत्रकारांशी ते बोलत होते.

कोरोना महामारीविरोधात भाजप ज्या पद्धतीन काम करत आहे त्यातुलनेने राज्य सरकार काम करत नाही. तात्पुरत्या उभा करत असलेल्या कोविड सेंटर, मृतदेहाला लागणाऱ्या बॅग आणि पीपीई किट यामध्ये राज्य सरकारने भ्रष्टाचार केल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

जीएसटीमधून 19 हजार कोटी आलेत तुम्ही एक रुपयांच पॅकेज सामान्य नागरिकांना दिले नाही?, धारावीत दीडशे रुपयांना पीपीई किट मिळतं, ब्रँडेड साडेचारशे, तुम्ही 1300 रुपयांना घेताय करोनाच्या नावाखाली भ्रष्टाचार करायला मोकळे आणि आम्ही सामान्य माणसाचे प्रश्न सोडवायचे नाहीत, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  महाराष्ट्रात साडेचार महिन्यांपासून 2 कोटी 88 लाख लोकांना जेवण दिलं. 40 लाख लोकांना किरणा सामानाचे पॅकेट्स दिले. नागरिकांची स्क्रिनिंग आम्ही करत आहोत. हिंजवडीत 104 बेडचं कोविड सेंटर उभारलं असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! अंगणात तीन चिमुरड्यांचा रंगला होता डाव अन् अचानक…

रक्षाबंधन दोन दिवसांवर असताना कोरोनाने महापौर किशोरी पेडणेकरांच्या मोठ्या भावाचा केला घात!!

“महाविकास आघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका”

सुशांतच्या जवळच्या बॉडीगार्डचा धक्कादायक खुलासा; सुशांत बेशुद्ध अवस्थेत असायचा तेव्हा रिया…

खळबळजनक! भाजपचे 40 आमदार माझ्या संपर्कात; बच्चू कडूंचा गौप्यस्फोट