Online Aadhar Card Update l नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सरकारने 14 मार्च ते 14 जून 2024 पर्यंत मोफत आधार कार्ड माहिती अपडेट करण्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे आता देशातील करोडो जनतेला चार महिन्यांचा वेळ मिळाला आहे. UIDAI ने लाखो आधार धारकांना लाभ देण्यासाठी मोफत ऑनलाइन कागदपत्र अपलोड करण्याची सुविधा 14 जून 2024 पर्यंत वाढवली आहे. ही मोफत सेवा फक्त myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. जर तुमचं आधारकार्ड 10 वर्षांपेक्षा जुने असेल आणि ते कधीही अपडेट केलेल नसेल तर तुम्हाला ते अपडेट करावा लागेल.
Online Aadhar Card Update l आधारकार्ड कुठे आवश्यक आहे? :
आधारकार्ड हे बँक खाते उघडणे, सरकारी योजनांचा लाभ घेणे, सिम कार्ड खरेदी करणे, घर खरेदी करणे इत्यादी सर्व पैशाशी संबंधित कामांसाठी आधार कार्ड आता आवश्यक कागदपत्र बनले आहे. जर तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट केले नाही तर तुम्हाला महत्वाची कामे करता येणार नाही. अनेक वेळा चुकीच्या माहितीमुळे अनेकांना योजनांचा लाभ घेता येत नाही.
Online Aadhar Card Update l आधारकार्ड ऑनलाइन अपडेट कसे करावे? :
– सर्वात प्रथम https://myaadhaar.uidai.gov.in/ ला या वेबसाईटला भेट द्या आणि तुमचा आधार क्रमांक आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर मिळालेला वन-टाइम पासवर्ड (OTP) वापरून लॉग इन करा.
– त्यानंतर आधार अपडेटचा पर्याय निवडावा लागेल.
– त्यानंतर, तुमचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाकून तुम्हाला प्राप्त होणारा OTP सबमिट करावा लागेल.
– त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपडेटचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड संबंधित माहिती दिसेल.
– यानंतर तुम्हाला दिलेली माहिती पडताळणी केल्यानंतर, पत्ता अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. यानंतर आधार अपडेट प्रक्रिया स्वीकारा.
– त्यानंतर तुम्हाला 14 नंबरचा अपडेट रिक्वेस्ट नंबर मिळेल.याद्वारे तुम्ही आधार अपडेटच्या प्रक्रियेचा मागोवा घेऊ शकता.
News Title : Online Aadhar Card Update
महत्त्वाच्या बातम्या-
उद्यापासून सुरु होतोय खरमास; जाणून घ्या खरमासमध्ये काय करू नये
आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींनी कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा
तरुणांचं सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न होणार साकार! या विभागात भरती प्रक्रिया सुरु
राजकीय भूकंप! वसंत मोरे यांनी ‘या’ कारणामुळे दिला राजीनामा
पुष्य नक्षत्रात खरेदी करा सोने-चांदी, वाहन, मालमत्ता; जाणून घ्या शुभ वेळ