“आमची कृती पक्षाच्या हिताची होती पक्षाविरुद्ध बंड करण्याची नाही”

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून देशात चांगलंच राजकीय नाट्य रंगलं आहे. विरोधी पक्ष आणि सरकार यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या खेळी चालूच आहेत. कॉंग्रेस पक्षांतर्गतसुद्धा गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी चालू आहेत. कॉंग्रेस पक्षातील काही नेतेच एकमेकांवर नाराज असल्याच्या चर्चा सध्या चालू आहेत.

कॉंग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी गेल्या एक वर्षापासून पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाच्या धुरा सांभाळत होत्या. सोनिया गांधी यांचा अध्यक्षपदाचा हंगमी कार्यकाळ पूर्ण होत असल्यामुळे मला पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना एक पत्र लिहलं होतं.

पक्षात सध्या मोठा बदल केला गेला पाहिजे. पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्षाची गरज आहे. यासाठी कॉंग्रेस पक्षासाठी पूर्ण वेळ अध्यक्ष निवडला जावा, अशी मागणी 23 नेत्यांनी पत्राद्वारे सोनिया गांधी यांना केली होती. या 23 नेत्यांची ही मागणी पक्षांतर्गत बंडाची कृती मानली जात होती. मात्र, यामधील बऱ्याच नेत्यांनी यामध्ये बंडाची कोणतीही कृती नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

आमची ही कृती कोणत्याही नेत्याला आवाहन देण्याची नव्हती किंवा पक्षाच्या विरोधात बंड करण्याची नव्हती. आमची ही कृती पक्षाच्या हिताची होती, असं पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी बऱ्याच नेत्यांनी स्पष्ट केलं आहे,

कोणतं पाऊल उचलल्यामुळे पक्ष आणखी मजबूत होवू शकतो एवढंच आम्ही या पत्राद्वारे निदर्शनास आणून दिलं आहे, असं पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांपैकी एक खासदार विवेक तनखा यांनी म्हटलं आहे.

आम्ही ही कृती कोणत्याही पदासाठी नव्हे तर देशाच्या हितासाठी केली होती, असं कपिल सिब्बाल यांनी स्पष्ट केलं आहे. तर माजी केंदीय मंत्री मुकुल वासनिक यांनी म्हटलं आहे कि, आम्ही हे पत्र पाठवून मोठा गुन्हा केला आहे असं ज्यांना वाटतं त्यांनाही पत्राद्वारे आम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे महत्व पटेल.

दरम्यान, सोमवारी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत सोनिया गांधीच पुढेही पक्षाच्या अंतरिम अध्यक्षपदी राहणार असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘विश्वासघाती सरकारवर कसा विश्वास ठेवायचा जनतेने’; नितेश राणेंची राज्य सरकारवर जोरदार टीका

“महाविकासआघाडी सरकारमध्ये कुणाचाच पायपोस कुणाच्या पायात नाही, अनैसर्गिक युतीची सत्ता जास्त काळ टीकत नाही”

वेगाच्या बादशहालाही कोरोनाने पकडलं; धावपटू उसेन बोल्टला कोरोनाची लागण, पार्टीला उपस्थित ख्रिस गेलचा रिपोर्ट आला…

सरकारमधील ‘या’ मंत्र्याने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

रियासोबत झाल्यानंतर आता अमिताभसोबत काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रीच्या गळ्यात हात घातलेला भट यांचा व्हिडीओ व्हायरल!