Top news महाराष्ट्र मुंबई

…म्हणून महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व मंत्री थेट सोनिया गांधींना भेटणार

मुंबई | राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकार मधील काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजात चालू आहे. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची वेळ मागितली आहे. सोनिया गांधींच्या भेटीसाठी महाराष्ट्रातील नेते दिल्लीत जाणार असल्याची माहिती समजत आहे.

महाविकास आघाडीतील कॉंग्रेसचे अनेक नेते सरकारमधील समन्वयाबाबत नाराज आहेत. काँग्रेस नेते नाराजी स्पष्टपणे व्यक्त करत नसले तरी दबक्या आवाजात या चर्चा चालू आहेत. मात्र आता काँग्रेस नेते याबाबत थेट सोनिया गांधींकडे तक्रार करणार आहेत.

महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे नेते सोमवार किंवा मंगळवारी सोनिया गांधींना भेटण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींना भेटीसाठी वेळ मागितली आहे. दिल्लीत होणाऱ्या या बैठकीसाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व मंत्री उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे, अशी माहिती काँग्रेसच्या एका नेत्याने दिली आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याबरोबर इतर काही नेते नाराज असल्याची माहिती समोर आली होती. नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक पार पडली होती. मात्र, यातून काहीही मार्ग निघत नसल्याने महाराष्ट्रातील काँग्रेस नेते थेट सोनिया गांधींची भेट घेणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

फडणवीसांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आमलात आणलेली ‘ती’ योजना ठाकरे सरकारकडून रद्द

‘मंदिर पाडून मस्जिद बांधली नव्हती, आता मात्र मंदिर पाडून मस्जिद बांधली जाईल’; ‘या’ मु्स्लिम नेत्याने दिली धमकी!

रिया चक्रवर्ती तर देहव्यापार करणाऱ्यांपेक्षाही…; बॉलिवुडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री संतापल

धक्कादायक! भरदिवसा मित्राच्या डोळ्यादेखत तरुणीला उचलून नेत केला बलात्कार

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांंना कोरोनाची लागण