कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका, खपवून घेतलं जाणार नाही- धनंजय मुंडे

बीड | लॉकडाऊन मध्ये बाहेर पडलेल्या काही जणांना पोलिसांच्या लाठीचा सामना करावा लागला, काही ठिकाणी तर नागरिकांनी पोलिसांशी वाद घातल्याचेही प्रकार घडले. यावरून मंत्री धनंजय मुंडे यांनी कोणीही कायदा हातात घेतलेल खपवून घेतलं जाणार नाही असा सूचक इशारा दिला आहे. याबबात त्यांनी फेसबुकवरून एक पोस्ट केली आहे.

पोलीस, डॉक्टर्स, नर्स, शासकीय कर्मचारी हे अहोरात्र जनतेची काळजी घेण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, त्यांचा सन्मान करा, नियमांचे पालन करा, असं आवाहन मुंडे यांनी केलं आहे.

सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 या ठरवून दिलेल्या वेळेत तेही कुटुंबातील एकच सदस्याने बाहेर यावे. घालून दिलेले नियम हे जनतेच्याच हितासाठी आहेत. त्या नियमांचे पालन केल्यास अशी वेळ येणारच नाही, असं मुंडे यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यासह राज्यात कोरोनाबाबत सोशल मीडियावर अफवांचा पेव फुटला आहे. माझं संपूर्ण जनतेला आवाहन आहे की आपण कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं मुंडेंनी सांगितलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

-घरात येणाऱ्या माशांपासूनही कोरोना होऊ शकतो- अमिताभ बच्चन

-गोरगरीबांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली ‘इतक्या’ हजार कोटींची घोषणा

-धक्कादायक! पोलिसांकडूनच पोलिसाला आणि त्याच्या मुलीला बेदम मारहाण

-वाह दादा वाह! गोर-गरीब गरजुंसाठी गांगुलीकडून 50 लाखांची मदत

-लष्कराची मदत घेण्याची वेळ येऊ देऊ नका- अजित पवार