आमच्यासाठी 10,000 व्हेंटिलेटर बनवा, तुमचे उपकार कधीच विसरणार नाही- शोएब अख्तर

मुंबई | सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. भारताचा पारंपरिक शेजारी म्हणून ओळख असलेल्या पाकिस्तानातही सध्या करोनामुळे भीषण परिस्थिती तयार झाली आहे. अशा खडतर परिस्थितीत निधी जमवम्यासाठी भारत आणि पाकिस्तान मालिका खेळवणाचा प्रस्ताव पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं ठेवला आहे.

आमच्यासाठी 10,000 व्हेंटिलेटर बनवा, तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. आम्ही केवळ सामन्यांचा प्रस्ताव ठेवू शकतो. निर्णय अधिकाऱ्यांना घ्यायचा आहे, असं शोएब अख्तरनं म्हटलं आहे.

मालिकेचा निकाल काहीही आला तरी पहिल्यांदाच दोन्ही देशांपैकी कोणत्याही क्रिकेटप्रेमींना दु:ख होणार नाही. विराट कोहलीने शतक ठोकलं तर आम्ही खुश होऊ. बाबर आजमने शतक केलं तर तुम्ही आनंदी व्हाल. सामन्याचा निकाल काहीही आला तरी दोन्ही संघ विजयी होतील. यामुळे दोन्ही देशांचे राजकीय संबंधही सुधारतील, असंही अख्तरनं म्हटलं आहे.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या चार हजारांच्या पार केली आहे. आतापर्यंत 58 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र पंतप्रधान इम्रान खान यांनी अजूनही लॉकडाऊन लावलेला नाही.

महत्वाच्या बातम्या-

-‘रामायण’ मालिकेत सुग्रीवची भूमिका साकारणारे श्याम सुंदर काळाच्या पडद्याआड

-शिवभोजन एकदाच मिळतं, दुसऱ्यांदा काय लोकांनी उपाशी राहावं का?- देवेंद्र फडणवीस

-तुझे हातपाय मोडले असते; पोलीस अधिकाऱ्याची जितेंद्र आव्हाडांना धमकी

-कोरोना विरोधातील लढाईसाठी काँग्रेसची टास्कफोर्स; ‘या’ 18 नेत्यांना जबाबदारी दिली

-‘या’ राज्याच्या सरकारनं लॉकडाउन वाढवला; देशातील पहिलं राज्य