“अमित शहांच्या डोक्यात दिवसरात्र सरकार पाडण्याचा विचार असतो”

नवी दिल्ली | भाजपने अनेक राज्यात ऑपरेशन लोटस करून त्या राज्यातील निवडून आलेल्या सरकारला बरखास्त करत त्या राज्यात आपली सत्ता प्रस्थपित केली. याच पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गृहमंत्री अमित शहांवर टीकास्त्र सोडलं आहे. यासंदर्भात गेहलोत यांनी ट्विट केलं आहे.

कर्नाटक, मध्यप्रदेश, मणीपूर किंवा गोव्यातील सरकार पाडण्यात नेहमी अमित शहांचं नाव आघाडीवर राहिलं आहे. त्यामुळे मला नाईलाजानं असं म्हणावं लागत आहे की अमित शहांच्या डोक्यात दिवसरात्र सरकार पाडण्याच विचार चालू असतो, अशी टीका अशोक गेहलोत यांनी केली आहे.

जनतेने निवडून दिलेली सरकार भाजप अनैतिक मार्गाने पाडत आहे. असं जर होत असेल तर लोकशाही ही फक्त नावाला उरली आहे. पक्ष येतात-जातात तसेच सरकार बनतात आणि पडतातही मात्र जर लोकशाही नसेल राहणार तर देशाला धोका असल्याचं गेहलोत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आपल्या सर्वांचं एक नागरिक म्हणून कर्तव्य आहे. लोकप्रतिनिधी, न्यायालय, पत्रकार या सर्वांनीच लोकशाहीला वाचविण्यासाठी नेहमी पुढं यायला हवं, असं आवाहनही गेहलोत यांनी केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

झोपेत असलेल्या तरुणाच्या पॅंटमध्ये कोब्रा नाग शिरला अन्…

‘वडील रुग्णालयात भर्ती, आता कोणच्या जीवावर खाणार’; अभिषेक बच्चनने हेटर्सना दिलं हे सणसणीत उत्तर!

धक्कादायक! पत्नीसह नातेवाईकावर कोयत्याने सपासप वार करत दोघांना संपवलं

संतापजनक! पुन्हा एकदा महिला आरोग्य कर्मचाऱ्यासोबत घडला संतापजनक प्रकार

कौतूकास्पद! रक्ताच्या नात्यांनी अंत्यसंस्कारासाठी नाकारलं पण माणुसकीच्या नात्याने निभावलं; सरपंचाने घातला अनोखा आदर्श