महाराष्ट्रातले 15 कोरोना पेशंट ठणठणीत बरे झाले आहेत; आरोग्य यंत्रणेला मोठं यश

मुंबई | महाराष्ट्रातील 15 कोरोनाबाधितांची तब्येत ठणठणीत असून ते आता डिस्चार्जच्या वाटेवर आहेत. लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळू शकतो, अशी गोड बातमी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्राला दिली आहे. महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेचं हे मोठं यश म्हणावं लागेल.

मुंबईमध्ये 12, पुण्यात 2 तर औरंगाबादमध्ये 1, अशा एकूण 15 जणांना डिस्चार्ज मिळू शकतो, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. जरी कोरोना झाला तरी यातून बरं होता येतं ही समाधानाची बाब आहे. ही गोष्ट समाजात फार सकारात्मकता घेऊन जाणार आहे, असंही टोपे म्हणाले.

आज स्थितीला 106 रूग्ण अ‌ॅडमिट आहेत. त्यामधील 2 अतिदक्षता विभागामध्ये आहेत तर इतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, अनेक कंपन्या सीएसआरच्या माध्यमातून मदत करत आहेत. त्यांचं मी आभार मानतो. त्यांना आवाहनही करेल, अशा परिस्थितीत अशाच प्रकारच्या मदतीची अपेक्षा आहे, असं ते म्हणाले.

 

महत्वाच्या बातम्या – 

-“…तर देशातील कोरोनाग्रस्तांचा अपेक्षित आकडा 62 टक्क्यांनी कमी होईल”

-शहरातून गावाकडे पळणाऱ्यांना संजय राऊत यांचा सोप्या शब्दात खास सल्ला!

-‘कोरोना रोखण्यासाठी भारताने घेतलेले निर्णय योग्यच’; WHO कडून भारताचं कौतुक

-26 मार्चला होणारी राज्यसभेची निवडणूक आयोगाने पुढे ढकलली

-पंतप्रधान मोदी आज रात्री 8 वाजता पुन्हा संबोधित करणार; काय घोषणा करणार??