18 वर्षांचा ‘BABY ABD’ लिलावात मालामाल; मुंबईने लावली तब्बल ‘इतक्या’ कोटींची बोली

बंगळुरू | आयपीएल लिलावाला (IPL Auction 2022) आजपासून सुरूवात झाली आहे. दोन दिवसांच्या या लिलावात आज मोठ्या खेळाडूंवर बोली लावली जात आहे. अशातच आता मुंबईसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. (IPL 2022 Auction Live Updates)

मुंबईने आजच्या लिलावात काही मोजक्यात खेळाडूंवर बोली लावल्याचं पहायला मिळतंय. मुंबईने आतापर्यंत फक्त भारताचा आक्रमक खेळाडू ईशान किशनवर बोली लावली आहे. ही बोली आजची सर्वांत मोठी बोली राहिली होती.

मुंबईने ईशान किशनला तब्बल 15 कोटी 25 लाख इतक्या रक्कमेला विकत घेतलं आहे. अशातच आता मुंबईने ऑक्शनमध्ये दुसरा मोठा डाव लावला आहे.

अंडर-19 विश्वचषकात वादळ निर्माण करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसवर मुंबईने बोली लावली आहे. 18 वर्षांच्या डेवाल्ड ब्रेविसची मुळ किंमत 20 लाख होती.

डेवाल्ड ब्रेविसच्या नावावर चेन्नई आणि पंजाब किंग्ज यांच्यात चुरशीची स्पर्धा झाली. किंमत 1.7 कोटीवर गेल्यानंतर मुंबईने एन्ट्री घेतली.

अखेर मुंबईने 3 कोटीची बोली लावत डेवाल्ड ब्रेविसच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. डेवाल्ड ब्रेविसला क्रिकेटमध्ये ‘बेबी एबीडी’ म्हटलं जातं.

विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी ब्रेव्हिसला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं होतं. यानंतर आयसीसीच्या प्लेअर ऑफ द मंथच्या यादीतही त्याचा समावेश झाला होता.

दरम्यान,एबी डिव्हिलियर्सला आपला आदर्श मानणाऱ्या ब्रेव्हिसची आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा आता पु्र्ण होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘टाटा नेक्सॅान’मध्ये आता इलेक्ट्रिक सनरुफसुद्धा मिळणार, किंमत फक्त…

 तुमचं आयुष्य कमी तर होत नाही ना?, नॉनव्हेज खाणारांनो एकदा नक्की वाचा

मोठी बातमी! आयपीएलची लिलाव प्रक्रिया थांबली, Auctioneer अचानक खाली कोसळले ; पाहा व्हिडीओ

क्रूझ पार्टी अटकेनंतर पहिल्यांदाच दिसला आर्यन खान, फोटो झाले व्हायरल

मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा धक्का, ‘या’ स्टार खेळाडूला संघात घेण्यात अपयश