आर्थिक मंदीमुळे मारूती सुझुकीमध्ये 3 हजार कर्मचाऱ्यांची कपात

मुंबई | आर्थिक मंदीमुळे ऑटो इंडस्ट्रीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. मारुती सुझुकीने तब्बल 3 हजार कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू  केले नाहीत, अशी माहिती मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे चेअरमन आरसी भार्गव यांनी दिली आहे.

कारच्या किंमतीत टॅक्समुळे वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांची खरेदी मंदावली आहे, असं कंपनीच्या वार्षिक शेअरहोल्डर्स बैठकीत भार्गव यांनी सांगितलं आहे.

मंदीमुळे ऑटो कंपनींत आतापर्यंत 20 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. जर असे सुरु राहिले तर 13 लाख लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. जुलैमध्ये सलग 9 व्या महिन्यात गाड्यांच्या विक्रीत घट झाली आहे. त्यामुळे कंपनींनी आपली उत्पादन थांबवली आहेत.

देशात आलेल्या मंदीमुळे ऑटो इंडस्ट्रीशिवाय इतर क्षेत्रालाही याचा फटका बसला आहे. पारलेजी , ब्रिटानीया यांनीही आपल्या कंपनीतून अनेक कर्माचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे. मंदीमुळे आणखी नोकऱ्या जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-