मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेना गेल्याने काही शिवसैनिक नाराज झाल्याचं समोर येत आहे. धारावी येथील 400 शिवसैनिकांनी पक्षाला रामराम करत भाजपत प्रवेश केला आहे.
शिवसेना भ्रष्टाचारी पक्षासोबत सत्तेत सहभागी झाली. हिंदू पक्षाविरोधात शिवसेनेनं हातमिळवणी केल्याने आम्हाला स्वत:ला फसवणुकीची भावना निर्माण झाली. फक्त सत्तेसाठी शिवसेना महाविकास आघाडीत सहभागी झाली असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.
मागील 7 वर्षापासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात आम्ही लढत आहोत. निवडणुकीच्या काळात आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन मतं मागितली. पण आता त्यांना कोणत्या तोंडाने सामोरे जाणार?, असं भाजपत सहभागी झालेले शिवसैनिक रमेश नाडार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, यापूर्वी रमेश सोळंकी नावाच्या शिवसैनिकाने मंगळवारी रात्री पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
महत्वाच्या बातम्या-
कांद्याच्या दरवाढीवर देशाच्या अर्थमंत्री म्हणतात; मी कांदा खात नाही…! – https://t.co/179qh1uTSm @nsitharaman @supriya_sule @NCPspeaks @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019
स्वत:चा आत्मसन्मान जपा आणि अन्याय होतोय तर बाहेर पडा- अनिल गोटे https://t.co/wYTaQzMd9E @anilgote11 @EknathKhadseBJP @Pankajamunde @BJP4Maharashtra #BJP @thodkyaat
— Akshay Adhav (@AkshayGAdhav) December 5, 2019
“मोदी एका दगडात 2 पक्षी मारायचे तर पवारसाहेब 4 पक्षी मारतात” – https://t.co/8psBQgtBvo @narendramodi @PawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019