धक्कादायक! कोरोनामुळे इटलीत एका दिवसात 475 जणांचा मृत्यू

रोम | कोरोना व्हायरसमुळे इटलीमध्ये एका दिवसात 475 जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. इटलीमधील मृतांचा एकूण आकडा 3 हजाराच्या आसपास पोहोचला आहे.

कोरोनाचा प्रादूर्भाव झाल्यापासून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी प्राण गमावले आहेत. इटलीमध्ये कोरोना व्हायरसचे एकूण 35, 713 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांपैकी 4 हजार जणांवरील उपचार यशस्वी झाले असून ते बरे झाले आहेत.

इटलीमधील लोम्बार्डीमध्ये कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला असून इथे एकाच दिवसात 319 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, चीनपाठोपाठ इटलीमध्ये कोरोना व्हायरसचा सर्वांत जास्त प्रादूर्भाव आढळून आलेला आहे. कोरोनानं आतापर्यंत 8,758 जणांचा बळी घेतला असून चीनमध्ये मृतांची संख्या सर्वाधिक आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनापासून वाचण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी जनतेला केलं ‘हे’ आवाहन

-कोरोनामुळे पुण्यातील 584 पीएमपीएमएलच्या फेऱ्या बंद

-“आम्ही पण भारतीय, आम्हाला कोरोना म्हणणं बंद करा”; पाहा व्हिडीओ

-डोनाल्ड ट्रम्प कोरोनाला म्हणाले ‘चिनी व्हायरस’; संतापलेल्या चीननं केली कारवाई

-…म्हणून रितेश देशमुख कोरोनाग्रस्त रुग्णावर संतापला