राज्यात 72 हजार पदांची मेगाभरती… ऑफलाईन भरती होणार!

मुंबई |  राज्यात 72 हजार पदांच्या मेगाभरतीला सुरूवात झालीये. मात्र ही मेगाभरती महापोर्टलद्वारे नाही तर ऑफलाईन होणार आहे. सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मेगाभरती सुरू करण्यासाठी आरक्षण तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मेगाभरतीमध्ये पाणीपुरवठा, शिक्षण, महसूल, आरोग्य, गृह, सामाजिक न्याय यांसह अन्य विभागांचा देखील समावेश आहे. आता प्रत्येक विभाग स्तरावर पदभरतीची प्रक्रिया राबवली जाईल. त्यानुसार संबंधित विभागांची कार्यवाही देखील सुरू झाली आहे.

पदभरतीची प्रक्रिया एप्रिलपासून सुरू होणार असून नव्या पदभरतीनंतर राज्यावर साडे आठ हजार कोटी रूपयांचा बोजा पडणार आहे. त्याची अर्थसंकल्पात तरतूद करून जाहिरात काढली जाईल.

पूर्वीच्या फडणवीस सरकारने अर्ज मागवले त्या अर्जाचं काय करायचं? किंवा जुने अर्ज पुढे येणाऱ्या जाहिरातीसाठी गृहित धरायचे का? यावर शासन पातळीवर चर्चा सुरू आहे.

  • महापोर्टलद्वारे नाही तर विभाग स्तरावर भरती प्रक्रिया होणार
  • पदांसाठी आरक्षण पडताळणीचं काम युद्धपातळीवर
  • 72 हजार पदांसाठीच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू

महत्त्वाच्या बातम्या-

-इंदुरीकर महाराजांनी यूट्यूब चॅनेलवाल्यांना दिला दणका; चॅनेलवाल्यांनी उडवले सर्व व्हिडीओ

-‘2024च्या आधी पुन्हा पुलवामा हल्ला होईल’; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने एकच खळबळ

-यूट्यूबवाले काड्या करतात; यूट्यूब चॅनलवाल्यांनीच मला संपवलं- इंदुरीकर

-आता आपली कपॅसिटी संपली… बघेन बघेन अन् उद्या-परवाचं किर्तन सोडून शेती करेन- इंदुरीकर

-सत्तेसाठी भुकेल्या शरद पवार यांनी उसनं अवसान आणू नये; भाजप नेत्याची खरमरीत टीका