छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरने हटवण्याचा प्रयत्न; संभाजीराजे भडकले

मुंबई | मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरने हटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकारामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. खासदार संभाजीराजे यांनीही यावर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जेसीबी लावून पाडत असलेला व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं. मध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकारने व पक्षाच्या अध्यक्षांनी याचा त्वरित खुलासा करावा. जनाक्रोश एवढा जास्त आहे, की त्याची झळ त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत संभाजीराजेंनी इशारा दिला आहे.

मूर्ती काढावीच लागणार होती, तर त्याची पद्धत सन्मानजनक ही करता आली असती. असल्या क्रूर पद्धतीने हटवून तुम्ही नेमकं काय सिद्ध करू पाहत आहात?, असा सवालही संभाजीराजेंनी केला आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यातल्या एका शहरात वाहतुकीस अडथळा ठरतो या कारणाने शिवरायांचा अर्धपुतळा असलेला चौथरा हटवण्यात आला आहे. यावरुन भाजपने राज्यातील शिवसेना-काँग्रेसवर टीका केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-“चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री व्हायचंय पण…”

-दादा खेळत रहा, वेळ चांगला जाईल; शिवसेनेचा चंद्रकांत पाटलांना सल्ला

-…तर मनसेचा राज्यात एकही आमदार दिसणार नाही; इम्तियाज जलीलांचा इशारा

-“माझ्या समाजासाठी शरद पवारच मोठा आधार”

-‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी सांगितला पहिल्या प्रेमाचा किस्सा!