फेसबुकनं रिलायन्स जिओमध्ये गुंतवले ‘एवढे’ हजार कोटी

नवी दिल्ली  |  कोरोना व्हायरसने जगातल्या अनेक देशांत आपले हातपाय पसरले आहेत. त्यामुळे जगभरातले बाजार चिंतेत आहेत. अशातच फेसबुकने रिलायन्स जिओमध्ये 43 हजार 574 कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. सद्य परिस्थितीत ही गुंतवणूक डोळे फिरवणारी आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड आणि फेसबुकने गुंतवणूक करारावर स्वाक्षरी केल्याची घोषण केली आहे. जिओ प्लॅटफॉर्मवर फेसबुकद्वारे, 43,574 कोटींच्या गुंतवणूकीसाठी बंधनकारक करारावर स्वाक्षरी केल्याचं तिन्ही कंपन्यांनी सांगितलं आहे.

फेसबुकची गुंतवणूक संपूर्ण सौम्य आधारावर जिओ प्लॅटफॉर्ममधील 9.99% समान भागीदारीमध्ये असेल. 388 मिलियन सबस्क्रायबर्सचं रिलायन्सचं दूरसंचार युनिट रिलायन्स प्लॅटफॉर्मची संपूर्ण मालकीची सहाय्यक कंपनी कायम राहील.

दरम्यान, जगातल्या सगळ्या बाजारांमध्ये मंदी असताना आणि कोरोनाचं एवढं भयान संकट असताना देखील फेसबुकने रिलायन्स जिओमध्ये केलेली गुंतवणूक चर्चेचा विषय ठरते आहे. या गुंतवणुकीने अनेकांचे डोळे विस्फारले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड रूग्णालयात दाखल

-कोरोनासंबंधी मोदींनी घेतलेले निर्णय जगात सर्वोत्तम…

-राज्य शासन अपयशी का ठरले? मेधा कुलकर्णींचा ठाकरे सरकारला सवाल

-ही नावं त्यांच्यासाठी जी धार्मिक दंगा करण्याच्या प्रयत्नात; पालघरमधल्या 101 आरोपींची गृहमंत्र्यांकडून नावे जाहीर

-गुड न्यूज! एका दिवसात 705 कोरोनाग्रस्त रूग्ण बरे झाले