पुण्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले? किती रुग्णांना मिळाला डिस्चार्ज???

पुणे | गेल्या आठवड्याभरापासून पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रूग्णांची संख्या वाढत आहेत. ही संख्या दररोज जवळपास 150 रूग्णांनी वाढते आहे. आज पुण्यात 152 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे.

पुण्यातील एकूण रूग्णसंख्या आता 3899 वर पोहचली आहे. त्यापैकी 1656 रूग्ण अ‌ॅक्टीव्ह आहेत. 165 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 43 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

दुसरीकडे पुण्यात रूग्णांचा बरा होण्याचा आकडा देखील वाढतो आहे. गेल्या काही दिवसांपासून रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी जाण्याचा आकडा चांगलाच वाढल्याने नागरिकांना देखील दिलासा मिळतो आहे. आज 113 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 2023 रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत.

पुण्यात आज दिवसभरात 14 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यातली एकूण मृत्यूंची संख्या आता 221 वर पोहचली आहे. आज 1507 स्वॅब तपासण्या केल्या गेल्या. त्यापैकी 152 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-घरच्या अंगणाला रणांगण बनवणं याला शहाणपण म्हणत नाही; अजितदादा भडकले

-कोरोना परिस्थितीबाबत राज्यपालांनी बोलावली होती बैठक; मुख्यमंत्री जाणार नाहीत!

-…तर मुख्यमंत्री महोदय चुकीला माफी नाही; भाजपचा इशारा

-रेल्वेनंतर विमानसेवा देखील सुरू होणार, या तारखेपासून विमाने उड्डाण घेणार…

-फडणवीस दिल्लीतील नेत्यांच्या संपर्कात, राज्यात अस्थिरता पसरवण्याचा डाव- बाळासाहेब थोरात