हार्दिक पांड्या म्हणतो, कुणी तरी येणार येणार गं…!

नवी दिल्ली |  भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ‘बाप’ बनणार आहे, यासंबंधीची माहिती त्याने आपल्या सोशल मीडियावरून दिली आहे. हार्दिक पांड्याने ही बातमी देऊन आपल्या तमाम चाहत्यांना खूशखबर दिली आहे.

हार्दिक पांड्याने त्याची मैत्रिण सर्बियाची अभिनेत्री नताशा स्टानकोव्हिक हिच्या बरोबर जानेवारी महिन्यात साखरपुडा केला होता. लॉकडाऊन असल्याने नताशा पांड्याच्या कुटुंबाबरोबर होती. अशातच त्याने ही गोड बातमी दिली आहे.

नताशा आणि माझा आतापर्यंत खूप चांगला प्रवास राहिलेला आहे आणि आता आमचा प्रवास आणखीनच चांगला होणार आहे. आम्ही लवकरच नवीन जीवनाचे स्वागत करण्यासाठी उत्साहित आहोत, अशा भावना हार्दिकने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, हार्दिकने दिलेल्या गोड बातमीनंतर त्याच्यावर आता शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने त्याला शुभेच्छा देताना म्हटलंय, “नताशा आणि हार्दिकला खूप शुभेच्छा… तुमच्या परिवारातील तिसऱ्या सदस्याला खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद. त्याचबरोबर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने देखील हार्दिकला शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-‘सरकारने काम केलं नसतं तर…’; गुजरात उच्च न्यायालयाकडून आता सरकारचं कौतुक

-गरिबांना वाऱ्यावरती सोडणारे हे श्रीमंतांचे सरकार आहे – प्रकाश आंबेडकर

-“मुंबई-महाराष्ट्रात बेड्सची पुरेशी संख्या, कोरोनाचा सामना करण्यास ठाकरे सरकार खंबीर”

-रूग्णांना दिलासा देण्यासाठी पीपीई कीट घालून मंत्री यशोमती ठाकूर थेट कोविड वॉर्डात!

-शिवसेनेचे सोशल मीडियावर पेड ट्रोलर आहेत; फडणवीसांचा दावा