अबब ! कोरोना नसतानाही तरुणावर केले कोव्हीडचे उपचार अन्…

मुंबई | सध्या संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलं आहे. अशातच आता मुंबईतील माहीम येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माहीम येथील एका तरुणाचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह नसतानाही येथील फॅमिली केअर रुग्णालयामध्ये तरुणावर कोव्हीडचे उपचार करण्यात आले. त्यामुळे त्या तरुणाचा अवघ्या दहा तासातच मृत्यू झाला आहे.

माहीम कोळीवाडा येथील रहिवाशी प्रशांत काळे हा तरुण 25 जुलै रोजी स्थानिक रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र, यावेळी फॅमिली केअर रुग्णालयातील डॉक्टर किरण पाटील यांनी रुग्णात कोव्हीडची लक्षण असून त्याला त्वरित फॅमिली केअर सेंटरमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नातेवाईकांनी प्रशांतला रुग्णालयात दाखल केलं.

रुग्णाचे कोरोना रिपोर्ट आले नसल्यामुळे औषधे मिळत नव्हती. म्हणून डॉक्टरांनी दुसऱ्या रुग्णाचे रिपोर्ट आणि आधारकार्ड देऊन कुटुंबियांना औषधं आणण्यास सांगितली. कुटुंबियांनी औषधं आणली मात्र दहा तासातच प्रशांतचा मृत्यू झाला. रुग्णालयाने मृत युवकाच्या कुटुंबाकडून अडीच लाखाचं बिलही वसूल केलं.

कोरोना प्रोटोकॉल्सप्रमाणे प्रशांतवर अंत्यविधी करण्यात आला. मात्र, अंत्यविधी नंतर आलेल्या रिपोर्टमध्ये प्रशांत कोरोना निगेटिव्ह असल्याचं समजलं. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. साथरोग कायद्यांतर्गत रुग्णलयावर कारवाई केली गेली असून रुग्णालयाचा परवाना एक महिण्यासाठी निलंबित करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

संतापजनक! देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या सीआरपीएफच्या जवानानंच महिलेबरोबर केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात उद्धव ठाकरे काँग्रेस आणि बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली- उपमुख्यमंत्री

राज्याच्या आरोग्यमंत्र्यांवर दु: खाचा डोंगर; राजेश टोपेंच्या मातोश्रींचं निधन

“आम्ही येतोय रे ठाण्याला कोण अडवतंय बघूया, हे सरकार शिवशाहीचं नाही तर मोघलाईचं आहे”

दडी मारलेला पाऊस करणार दैना; पुढील 4 दिवस ‘या’ भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता