CM उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य; “चौथ्या लाटेला उंबरठ्यावरच रोखायचं असेल तर…”

मुंबई | गेल्या दोन वर्षांपासून कोरोना नागरिकांची पाठ सोडायला तयार नाहीये. कोरोनामुळं नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

दोन वर्षात नागरिक अनेकदा मोठ्या प्रमाणात निर्बंधांना समोरं गेले आहेत. अशात आता दोन महिन्यांपासून निर्बंध शिथिल केले होते.

निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी आता या महिन्यात कोरोनाचे रूग्ण आढळण्याचं प्रमाण वाढल्यानं चिंता वाढली आहे. परिणामी सरकार देखील अॅक्शन मोडमध्ये आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक बोलावली होती.

बैठकीत ठाकरेंनी प्रशासनाला लसीकरणावर भर देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर त्यांनी नागरिकांना देखील काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

चौथ्या लाटेला उंबरठ्यावर रोखायचं असेल तर नागरिकांनी स्वत:हून मास्क वापरणे, लस घेणं अनिवार्य आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, नागरिकांनी कोरोनाची लक्षणं आढळल्यास त्वरित डाॅक्टरांशी संपर्क साधण्याचं आवाहन देखील ठाकरेंनी केलं आहे. देशात काही राज्यात परत एकदा निर्बंध लादण्यास सुरूवात झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “माझ्या हातात ईडी द्या, मग दाखवतो सगळ्यांना”; उदयनराजे कडाडले

 PM आणि CM यांच्यातील वाकयुद्धात फडणवीसांनी उडी; ट्विट करत म्हणाले…

सोमय्यांची जखम खरी की खोटी?, डाॅक्टरांचा अहवाल आला अन् स्पष्टच झालं…

 “…तर सोमय्यांची हत्याच झाली असती”; भाजप नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ

 अनिल देशमुखांची जेलमधून सुटका होणार?; महत्त्वाची माहिती समोर