जमिनीवर बसलेल्या बाळाला माकडानं घेतलं कुशीत अन्……, पाहा व्हिडीओ

मुंबई| सोशल मीडियावर आपल्याला रोज नवनवीन व्हिडीओ पहायला मिळतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओनं लोकांच्या मनाला स्पर्श केलेला पहायला मिळाला.

सहसा लहान मुलं प्राण्यांना घाबरत असतात. त्यांच्यापासून पळ काढत असतात. मात्र या व्हिडीओमध्ये तुम्हाला काहीसं वेगळं पहायला मिळणार आहे. माकड पाहिल्यावर आपल्या मनात पहिला प्रश्न उभा राहतो की, तो अंगावर झडप तर मारणार नाही ना? या भितीपोटी आपण त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवतो. मात्र या व्हिडीओमधील माकडाच्या निरागसतेवर तुमचंही मन जिंकल्याशिवाय राहणार नाही.

काही तासांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. या व्हिडीओनं सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहे. या व्हिडीओमध्ये एक माकड अचानक खाली जमिनीवर बसलेल्या चिमुकल्या शेजारी जाऊन बसतं आणि त्या चिमुकल्याला आपल्या कुशीत घेतं. त्या माकडानं त्या लहानशा बाळाला काहीही नुकसान पोहचवलं नाही. त्या बाळाच्या बाजुला त्याची आईदेखील होती.

आईनं आपल्या बाळाला उचलण्याचा प्रयत्न केला मात्र ते माकड तिला त्या बाळाला उचलू देत नव्हतं. ते बाळही त्या माकडाच्या कुशीत शांतपणं बसलेलं पहायला मिळत आहे. माकडाचं हे निरागस प्रेम पाहून ते सगळे हैराण झाले आहेत.

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बऱ्याच लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केलं आहे. त्यामुळे हा व्हिडीओ मोठ्या प्रमााणात व्हायरल होत आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

अनिल देशमुखांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली…

औरंगाबादच्या ‘या’ रुग्णालयात कोरोना रुग्णांचे…

मुंबईतील 60 वर्षे जुन्या ‘या’ वडापावची जोरदार…

नियमित केळी खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

जाणून घ्या! कोरोनाच्या प्रादुर्भाव पाहता पुणेकरांसाठी…