भाजप आमदाराच्या घराबाहेर सापडलं लाखोंचं घबाड, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना भाजप आमदाराच्या घराबाहेर लाखोंचं घबाड सापडलं आहे. लाखोंचा ऐवज असलेली बॅग भाजप आमदाराच्या घराबाहेर सापडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या घराबाहेर एक पैशांनी भरलेली बॅग सापडल्याची माहिती समोर येत आहे. या बॅगमध्ये लाखोंचं ऐवज असल्याचं समोर आलं आहे.

प्रसाद लाड यांच्या माटुंगा येथील घराबाहेर एक बॅग आढळली. या बॅगमध्ये सोनं, चांदी तसेच मुर्ती देखील आढळल्या आहेत.

अज्ञात व्यक्तिनं ही बॅग प्रसाद लाड यांच्या घराबाहेर ठेवली. बेवारस बॅग आढळल्याने आधी परिसरात खळबळ उडाली मात्र यात पैशांसह महागड्या वस्तू आढळल्याने सुरक्षा रक्षकाने याबाबतची माहिती लाड यांना दिली.

या घटनेनंतर प्रसाद लाड यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती देखील घेतली आहे.

पोलिसांकडून प्रसाद लाड यांच्या घराबाहेरीत सीसीटीव्ही तपासला जात असून त्या अज्ञात व्यक्तिला शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. मात्र, आमदाराच्या घरासमोर अशा प्रकारे बॅग ठेवल्याने याकडे संशयाने पाहिलं जात आहे.

दरम्यान, राज्यात आषाढीचा उत्साह असताना दुसरीकडे आमदाराच्या घराबाहेर अशाप्रकारची घटना घडल्याने सगळीकडे खळबळ उडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“अमृता फडणवीसांनीच घरातलं गुपित फोडलं, नाहीतर या महान कलावंताची ओळख झालीच नसती”

चार पिढ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न

रावसाहेब दानवेंच्या दाव्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ, म्हणाले…

‘जाण्याआधी उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं होतं’; बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य

घराबाहेर पडत असाल तर सावधान; पुढील 3 दिवस ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता